व्हीलचेअरने दिव्यांग पोहोचले मतदान केंद्रांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:55 AM2019-10-22T00:55:18+5:302019-10-22T00:56:08+5:30

Maharashtra Assembly Election 2019 दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुविधांमुळे दिव्यांगांचा मतदानप्रक्रियेतील सहभाग वाढला असल्याचे दिसून आले. मॅपिंग करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना आवश्यकतेनुसार व्हीलचेअर पुरविण्यात आल्याने मतदान केंद्रांपर्यंत पोहोचून दिव्यांगांना मतदान करणे सुलभ झाले.

 Wheelchairs have reached the polling stations | व्हीलचेअरने दिव्यांग पोहोचले मतदान केंद्रांवर

व्हीलचेअरने दिव्यांग पोहोचले मतदान केंद्रांवर

Next

नाशिक : दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुविधांमुळे दिव्यांगांचा मतदानप्रक्रियेतील सहभाग वाढला असल्याचे दिसून आले. मॅपिंग करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना आवश्यकतेनुसार व्हीलचेअर पुरविण्यात आल्याने मतदान केंद्रांपर्यंत पोहोचून दिव्यांगांना मतदान करणे सुलभ झाले.
दिव्यांग मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दिव्यांगांना अनेकविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार दिव्यांगांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी सुमारे ४५० व्हीलचेअर्स आणि वाहनांची व्यवस्था असल्याने दिव्यांग बांधव मतदान केंद्रांवर पोहोचू शकले.
जिल्ह्यातील काही भागात दिव्यांगांना आणण्यासाठी शासनाचे वाहन पाठविण्यात आले तर सेक्टर आॅफिसरच्या गाडीमधूनदेखील दिव्यांग मतदार मतदानासाठी आले. मागणी करण्यात आल्यानुसार दिव्यांगांना आणण्यासाठी व्हीलचेअर्सदेखील पाठविण्यात आल्या.
अनेक सेवाभावी संस्थांनीदेखील व्हीलचेअरची सुविधा पुरवून दिव्यांग मतदारांना सहकार्य केले. शहरातील उर्दू हायस्कूल येथे सेवाभावी संस्थांच्या अनेक कार्यकर्त्यांनी केंद्रावर आलेल्या दिव्यांग मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविले. केंद्रातील प्रवेशद्वारावर रॅम्पची व्यवस्था करण्यात आली होती. तर अंध मतदारास एक मदतनीस बरोबर नेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यांच्यासाठी ब्रेल मतपत्रिकादेखील देण्याची व्यवस्था करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाकडून सुरुवातीला राबविण्यात आलेल्या मोहिमेत प्रारंभी दहा हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर अपंगांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांची मदत घेऊन आणखी दिव्यांगांपर्यंत पोहोचण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून दिव्यांग मतदारांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी वरच्या मजल्यावरील मतदान केंद्रे ही यापूर्वीच खालच्या मजल्यावर आणण्यात आलेली आहेत.
जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुविधांमुळे दिव्यांगांचा मतदानप्रक्रियेतील सहभाग वाढला असल्याचे दिसून आले. मॅपिंग करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना हीलचेअर पुरविण्यात आल्याने मतदान केंद्रांपर्यंत पोहोचून दिव्यांगांना मतदान करणे सुलभ झाले.
अनेक सेवाभावी संस्थांनीदेखील व्हीलचेअरची सुविधा पुरवून दिव्यांग मतदारांना सहकार्य केले. शहरातील उर्दू हायस्कूल येथे सेवाभावी संस्थांच्या अनेक कार्यकर्त्यांनी केंद्रावर आलेल्या दिव्यांग मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविले. केंद्रातील प्रवेशद्वारावर रॅम्पची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला.

Web Title:  Wheelchairs have reached the polling stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.