खुद्द कृषिमंत्रीच हतबल होतात तेव्हा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:31+5:302021-06-09T04:16:31+5:30
येथील मोसम पुलावरील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत भुसे बोलत होते. गेल्या आठवड्यात तालुक्यातील ...
येथील मोसम पुलावरील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत भुसे बोलत होते. गेल्या आठवड्यात तालुक्यातील कोठरे येथील रुग्णाच्या वाढीव बिलावरून भुसे यांनी सटाणा रोडवरील एका नामांकित खासगी रुग्णालयात स्टिंग ऑपरेशन करून रुग्णांकडून आर्थिक लूट केली जात असल्याची बाब उघडकीस आणली होती. यानंतर देखील संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ७) त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक झाली. यावेळी भुसे यांनी सांगितले, शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा संबंधित रुग्णालयात लाभ दिला जातो. मात्र, योजनेचा लाभ योग्यप्रकारे दिला जात नाही. आतापर्यंत १ हजार ४८६ रुग्णांना जीवनदायी योजनेतून उपचार करण्यात आले आहेत. शासनाने २ कोटी ४३ लाख ९९८ रुपये अदा केले आहेत, तरी देखील रुग्णांच्या नातेवाइकांकडून वाढीव बिले आकारली जातात. संबंधित रुग्णालय शासकीय सेवेत असलेल्या डॉक्टरांच्या व सध्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या नावावर आहे. खोट्या कागदपत्रांचा वापर करून रुग्णालय चालवले जात आहे. शासकीय सेवेत असताना डॉक्टरांच्या नावाखाली रुग्णालय कसे सुरू करता येते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बैठकीला बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, राजेंद्र जाधव, उपमहापौर नीलेश आहेर, महानगर प्रमुख रामा मिस्तरी, तालुकाप्रमुख संजय दुसाने, मनोहर बच्छाव, प्रमोद शुक्ला, विनोद वाघ, प्रमोद पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्फो
अधिकाऱ्यांवर ठपका
राज्याच्या जबाबदार पदावर असल्यामुळे पोलीस अधिकारी व महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. मात्र, जबाबदार अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही. चुकीचे काम शिवसेना पदाधिकारी खपवून घेणार नाही. येत्या गुरुवारपर्यंत कारवाई झाली नाही तर कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन केले जाईल, असा इशारा कृषिमंत्री भुसे यांनी दिला.
फोटो- ०७ मालेगाव दादा भुसे
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत पदाधिकारी.
===Photopath===
070621\07nsk_33_07062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०७ मालेगाव दादा भुसे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत पदाधिकारी.