संसद भवनाच्या पायऱ्यांवर भारती पवार नतमस्तक होतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:40+5:302021-07-21T04:11:40+5:30

सायखेडा : साधी राहणी, उच्च विचारसरणी, उच्चविभूषित असलेली एक महिला संसद भवन येथे येते. आपल्या गाडीतून खाली उतरून ...

When Bharti Pawar bows on the steps of Parliament House ... | संसद भवनाच्या पायऱ्यांवर भारती पवार नतमस्तक होतात तेव्हा...

संसद भवनाच्या पायऱ्यांवर भारती पवार नतमस्तक होतात तेव्हा...

Next

सायखेडा : साधी राहणी, उच्च विचारसरणी, उच्चविभूषित असलेली एक महिला संसद भवन येथे येते. आपल्या गाडीतून खाली उतरून संसद भवनाच्या पहिल्या पायरीवर माथा टेकवत नतमस्तक होते आणि त्याच क्षणात दिंडोरी मतदारसंघाचे संस्कार देशातील एकशेछत्तीस कोटी जनतेला दिसतात, खरोखरच ‘त्या’ आल्या नतमस्तक झाल्या आणि आपल्यातील संस्कारांची छबी जनतेला दिसली, त्या आहेत भारती पवार. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात चाळीस नवे मंत्री घेतले. त्यात डॉ. भारती पवार यांचा समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. सगळीकडे त्यांच्या कार्याचे गुणगान सुरू असतानाच पावसाळी अधिवेशन सुरू झाले. डॉ. भारती पवार मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा संसद भवनात आल्या होत्या. कुठल्याही प्रकारचा सरकारी लवाजमा किंवा रुबाब न दाखवता त्या आपल्या साध्या मराठमोळी वेशभूषेत संसद भवनाच्या पहिल्या पायरीवर आपला माथा टेकवत नतमस्तक झाल्या. संसद भवन एक मंदिर आहे आणि मंदिरात आपण सामान्य दैवी माणसांचे प्रतिनिधी म्हणून जात आहोत या अनमोल विचारातून त्या नतमस्तक झाल्या. त्यांच्यातील संस्कार अख्ख्या देशाने पाहिले. साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेल्या पवार यांनी आपल्यासोबत आपल्या ग्रामीण भागातील संस्कार देशात पोहोचवले.

---

सोशल मीडियावर व्हायरल

डॉ. भारती पवार यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला स्वातंत्र्यानंतर केवळ दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री म्हणून बहुमान मिळाला आहे. यशवंत चव्हाण यांच्यानंतर केंद्रात पवार यांना मिळालेले मंत्रिपद हे नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची घटना आहे. त्या घटनेला संस्काराची झालर पवार यांनी दिली. त्यांची ही कृती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (२० सायखेडा १/२/३)

200721\20nsk_19_20072021_13.jpg

२० सायखेडा १/२/३

Web Title: When Bharti Pawar bows on the steps of Parliament House ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.