...जेव्हा नाशिकच्या रु ग्णाचा मृतदेह भोपाळच्या दिशेने रवाना होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 01:28 AM2020-08-31T01:28:54+5:302020-08-31T01:29:18+5:30

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षातून उत्तरीय तपासणी होऊन संबंधित नातेवाइकांद्वारे ओळख पटवून प्रशासनाकडून दोन्ही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपविण्यात आले खरे; मात्र नाशिकचा मृतदेह थेट भोपाळच्या दिशेने आणि भोपाळवासीय मृत व्यक्तीचा मृतदेह नाशिककर कुटुंबीयांकडे आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नातेवाइकांची चूक असल्याचे सांगितले आहे.

... when the body of Rugna of Nashik is sent towards Bhopal | ...जेव्हा नाशिकच्या रु ग्णाचा मृतदेह भोपाळच्या दिशेने रवाना होतो

...जेव्हा नाशिकच्या रु ग्णाचा मृतदेह भोपाळच्या दिशेने रवाना होतो

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा शासकीय रु ग्णालय : नातेवाइकांनी पटविली ओळख

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षातून उत्तरीय तपासणी होऊन संबंधित नातेवाइकांद्वारे ओळख पटवून प्रशासनाकडून दोन्ही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपविण्यात आले खरे; मात्र नाशिकचा मृतदेह थेट भोपाळच्या दिशेने आणि भोपाळवासीय मृत व्यक्तीचा मृतदेह नाशिककर कुटुंबीयांकडे आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नातेवाइकांची चूक असल्याचे सांगितले आहे.
गेल्या शनिवारी संध्याकाळच्या सुमारास दोन मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले, मात्र यावेळी दोन्ही कुटुंबीयांची गफलत झाल्याने मृतदेह ताब्यात घेताना व रुग्णवाहिकेत ठेवताना आदलाबदल झाल्यामुळे नाशिककर मयत व्यक्तीचा मृतदेह भोपळच्या
रुग्णवाहिकेत आणि भोपाळस्थित मयत व्यक्तीचा मृतदेह नाशिकच्या कुटुंबीयांकडे आला.
दरम्यान, हा सगळा प्रकार नाशिककर कुटुंबीयांकडून मृतदेहाच्या अंत्यसंस्कारला घेऊन जात असताना निदर्शनास आला. त्यामुळे तत्काळ नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली.
मृतदेह आदलाबदलचा हा सगळा प्रकार नातेवाइकांच्या चुकीमुळे घडल्याचे स्पष्ट आहे. कारण दोन्ही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेताना नातेवाइकांनी ओळख पटविली होती.
त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून काही हलगर्जीपणा झालेला नाही. संबंधित नातेवाइकांची नोंद स्वाक्षरीसह रुग्णालयाच्या दप्तरी आहे,
रुग्णालय प्रशासाने सांगितले.याबाबत दिवसभर चर्चा सुरू होती.
टोलनाक्यावर मध्यरात्री मृतदेहांचा ताबा
नाशिककर कुटुंबातील सदस्यांनी भोपाळच्या दिशेने निघालेल्या रु ग्णवाहिकेच्या नातेवाइकांचा संपर्क
क्र मांक मिळवून तत्काळ त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. यामुळे त्वरित चांदवडजवळील टोलनाक्यावर भोपाळकडे जाणारी रु ग्णवाहिका थांबविण्यात आली. त्यानंतर नाशिक कुटुंबीयांनी त्यांच्याजवळ असलेला भोपाळस्थित व्यक्तीचा मृतदेह घेऊन रु ग्णवाहिकेने चांदवड घाठले आणि मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या मयत नातेवाइकांची पुन्हा खात्रीपूर्वक ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह आदलाबदलचा सगळा प्रकार नेमका जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला की नातेवाइकांच्या चुकीमुळे, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

Web Title: ... when the body of Rugna of Nashik is sent towards Bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.