डिहायड्रेशन होऊन अशक्त झालेल्या गायीला सलाईन लावले जाते तेव्हा...
By admin | Published: May 19, 2014 07:17 PM2014-05-19T19:17:53+5:302014-05-20T00:10:42+5:30
पांडाणे : डिहायड्रेशनचा त्रास होऊन अशक्त बनलेल्या एका गायीला दिंडोरी पंचायत समितीच्या आवारात सलाईन लावून जीवदान देण्यात आले.
पांडाणे : डिहायड्रेशनचा त्रास होऊन अशक्त बनलेल्या एका गायीला दिंडोरी पंचायत समितीच्या आवारात सलाईन लावून जीवदान देण्यात आले.
दिंडोरी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर एक गाय अचानक चक्कर येऊन पडली. त्यावेळी निफाड येथून कामकाजासाठी आलेल्या पूजा प्रल्हाद धुमाळ यांनी आवारातील एका हॉटेलमधून पाण्याच्या दोन बाटल्या आणल्या व गायीला पाणी पाजले. अल्पावधीतच मोठ्या संख्येने नागरिक तेथे गोळा झाले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. के. वायंडे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी एम. एच. काकडे यांना भ्रमणध्वनी करून घटनेची माहिती दिली. गायीची अवस्था पाहून आवारातच तिला सलाईन देण्यात आले. शिळे अन्न खाण्यात आल्याने गायीला डिहायड्रेशनचा त्रास झाला असावा, असा निष्कर्ष उपचार करणार्या डॉक्टरांनी काढला.
याप्रसंगी हातनोरे, अ. व. अहेर यांच्यासह नागरिकांनी सहकार्य केले. तत्काळ मदत मिळाल्याने गायीचे प्राण वाचू शकले. धावपळीच्या जमान्यात माणुसकी धर्म टिकून आहे हे पाहून बरे वाटते, अशा प्रतिक्रिया यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या.