एका आयपीएस अधिकाऱ्याचे होर्डिंग झळकते तेव्हा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:16 AM2021-03-23T04:16:09+5:302021-03-23T04:16:09+5:30

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दिघावकर यांनी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची सूत्रे तत्कालीन आयपीएस अधिकारी छेरिंग दोरजे यांच्याकडून ...

When the hoarding of an IPS officer flashes .... | एका आयपीएस अधिकाऱ्याचे होर्डिंग झळकते तेव्हा....

एका आयपीएस अधिकाऱ्याचे होर्डिंग झळकते तेव्हा....

Next

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दिघावकर यांनी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची सूत्रे तत्कालीन आयपीएस अधिकारी छेरिंग दोरजे यांच्याकडून स्वीकारली. दिघावकर हे मूळ नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र आहे. १९८७ च्या राज्यसेवा आयोगाच्या बॅचचे ते अधिकारी आहेत. जिल्ह्यातील अवैध धंदे, गुटख्याची तस्करी, शस्त्रांची तस्करी, जुगाराचे अड्डे, दारुच्या भट्ट्या नाशिक परिक्षेत्र अर्थात उत्तर महाराष्ट्रातून उद्ध्वस्त करण्याचे आदेश त्यांनी पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना दिलेत. यासोबत त्यांनी एक मोहीम हाती घेतली ती म्हणजे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची. ज्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतमाल खरेदी केला गेला; मात्र चालू बाजारभावानुसार ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे त्याची किंमत न देताच माल घेऊन पोबारा केला गेला, अशा लबाड व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्याचा त्यांनी विडा उचलला. याच मोहिमेचे फलित म्हणजे जिल्ह्यातील एका बळीराजाच्या सुपुत्राने चक्क दिघावकर यांच्या छायचित्रासह त्यांचे आभार मानणारा मजकूर असलेले भले मोठे होर्डिंग झळकावून टाकले.

--इन्फो--

...अन‌् शेतकऱ्यांच्या तक्रार अर्जांवरील धूळ झटकली गेली

दिघावकर यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शेतकरी फसवणूक प्रकरणावर भर देत व्यापाऱ्यांना कडक इशारा दिला. यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज तालुका पातळीवरील पोलीस ठाण्यांमधील फाईलींत धूळखात पडून होते, त्या सर्व अर्जांवरील धूळ यानिमित्ताने झटकली गेली. नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या सर्वच जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांनी शेतकऱ्यांचे फसवणुकीच्या बाबतीत प्राप्त झालेल्या अर्जांची युद्धपातळीवर चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

--इन्फो--

सात कोटी रुपये बळीराजाच्या पदरात

सप्टेंबरपासून डिसेंबर अखेरपर्यंत एकूण पाच जिल्ह्यातून १ हजार १९२ शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याचे गाऱ्हाणे अर्जातून मांडले. यापैकी १ हजार १६१ अर्ज केवळ नाशिक ग्रामीणमधून आले आहेत. फसवणुकीची एकूण रक्कम ४६ कोटी २० लाख ५२ हजार ४३६ च्या घरात पोहचली. ज्या व्यापाऱ्यांनी बुडविलेली रक्कम परत देण्यास असमर्थता दर्शविली अशा १९१ लबाडांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केले. २०० व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये आपआपसांत तडजोड होऊन १९९ व्यापाऱ्यांनी मिळून आतापर्यंत ६ कोटी ७५ लाख ८८ हजार ९८ रुपयांची रक्कम परत केली आहे. ५ कोटी ८४ लाख ४५ हजार ६१० रुपये इतकी रक्कम व्यापारी परत करण्यास तयार झाले आहेत. अशी एकूण १२ कोटी ६० लाख ३३ हजार ७०८ रुपयांची रक्कम वसूल करण्यास पोलिसांना यश आले आहे.

---

फोटो आर वर २२प्रताप नावाने सेव्ह आहे.

===Photopath===

220321\22nsk_36_22032021_13.jpg

===Caption===

डॉ. प्रतापराव दिघावकर यांचे झळकलेले होर्डींग

Web Title: When the hoarding of an IPS officer flashes ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.