रस्त्यावर दागिने सापडतात तेव्हा....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 11:32 PM2021-03-10T23:32:01+5:302021-03-11T01:31:17+5:30
इंदिरानगर : पाथर्डीफाटा परिसरातील आनंदनगर येथील पोलीस चौकीसमोरुन मार्गस्थ होत असताना दोघा जागरुक नागरिकांना रस्त्यावर बेवारस स्थितीत सोन्याची अंगठी व सोनसाखळी पडलेली आढळून आली. सुमारे ७६ हजार रुपये किंमतीचे हे दागिने घेऊन दोघांनी थेट इंदिरानगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांकडे अंगठी व सोनसाखळी सुपूर्द करत हकीगत सांगितली.

आनंदनगर रस्त्यावरुन बुधवारी (दि.१०) अनिल आहेर व निलेश परीट हे दोघे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जात असताना त्यांना रस्त्यावर एक सोन्याची चेन व अंगठी बेवारस स्थितीत पडलेली आढळली. या दोघांनी दागिणे उचलून घेत परिसरात विचारपूस केली असता कोणीही मालक पुढे आले नाही म्हणून सकाळी दहा वाजता त्यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात येत सोन्याची अंगठी व चेन प्रामाणिकपणे जमा केली. सोन्याची चेन व अंगठी रस्त्यावर पडली होती ते कोणीतरी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जमा केल्याची माहिती परिसरातील रहिवाशी दिनेश देसले यांना समजली. त्यांनी तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत सोन्याची चेन व अंगठीचे मालक आपण असल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी देसले यांच्याकडे विचारपूस करत योग्य ती शहनिशा करुन खात्री पटविली आणि मूळ मालक देसलेच असल्याचे सिध्द होताच त्यांनी आहेर व परीट यांच्यासमक्ष देसले यांना त्यांचे दागिने परत केले तसेच प्रामाणिकपणे सोन्याची चेन अंगठी देणाऱ्या आहेर व परीट यांच पुष्पगुच्छ देत कौतुकही केले.