...जेव्हा वृक्षछायेत जुळतात रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 10:42 PM2020-05-07T22:42:22+5:302020-05-07T22:44:59+5:30

ठरलेल्या मुहूर्तावर पुरोहितासह नववधू, नवरदेव व दोन्ही बाजूंचे अगदी दहा ते बारा व-हाडी आंब्याच्या सावलीखाली एकत्र आले आणि ठरलेल्या मुहूर्तावर मंगलाष्टके म्हणत गुरूजींना शुभमंगल पार पाडले.

 ... when marrige the shade of the tree | ...जेव्हा वृक्षछायेत जुळतात रेशीमगाठी

...जेव्हा वृक्षछायेत जुळतात रेशीमगाठी

Next
ठळक मुद्देकठीण काळात आपली हौसमौज महत्त्वाची नसतेदेश अन् देशाची स्थिती खूप महत्त्वाची ठरते

नाशिक : विवाहसोहळा म्हटला की अंगणात मांडव तर हमखास पडतो अन् त्या मांडवामध्ये मोठ्या थाटात नववधू-वराच्या आयुष्याच्या रेशीमगाठी जुळतात मात्र नाशिकमधील सय्यदपिंप्री या लहानशा गावात चक्क अंगणातील एका वृक्षाच्या सावलीतच नववधू-वरांवर बोटावर मोजण्याइतक्या कुटुंबियांनी अक्षता टाकत शुभाशिर्वाद दिले. कोरोनाच्या संकटकाळात अगदी साधेपणाने गायकवाड व शिरसाठ या दोन्ही कुटुंबियांनी आपल्या मुला-मुलीचा लग्नसमारंभ आटोपशीर घेतला.

ठरलेल्या मुहूर्तावर पुरोहितासह नववधू, नवरदेव व दोन्ही बाजूंचे अगदी दहा ते बारा व-हाडी आंब्याच्या सावलीखाली एकत्र आले आणि ठरलेल्या मुहूर्तावर मंगलाष्टके म्हणत गुरूजींना शुभमंगल पार पाडले. यावेळी जणू वाजंत्रीची भूमिका आंब्यावर बसलेल्या विविध पक्ष्यांनी त्यांच्या मंजूळ आवाजात चोख बजावली.
दीपक शिरसाठ, व माधुरी गायकवाड या दोघांचा विवाहसोहळा कोरोनाच्या काळात अगदी ‘लॉकडाउन’चे सर्व नियम पाळत पार पडला. या दोघांनी आपआपल्या तोंडावर मास्क बांधूनच ‘आंतर’ ठेवत एकमेकांच्या गळ्यात हार टाकला. दीपक एका चांगल्या कंपनीत सुपरवायझर तर माधुरी या लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला आहे. दोघेही सुशिक्षित असल्यामुळे त्यांनी आपल्या विवाहचे निमंत्रण सोशल मिडियावर आपल्या हितचिंतकांना धाडले खरे; मात्र या निमंत्रणात ‘आपल्या घरीच रहा, अन आमच्या भावी वैवाहिक आयुष्याकरिता शुभेच्छा द्या’, असे आवर्जून त्यांनी नमूदही केले.
मूळ चांदवड तालुक्यातील उसवाड गावच्या गायकवाड कुटुंबातील माधुरी. माधुरी आपल्या आजोळी सय्यद पिंपरी येथे येऊन स्थायिक झाल्या. तर दीपक हा सय्यद पिंपरी येथील शेतकरी चंद्रकांत शिरसाठ यांचा मुलगा. पुरोगामी विचारसरणीच्या या दोन्ही कुटुंबीयांनी या काळात आतिशय सध्या पद्धतीने लग्न क रत समाजापुढे कठीण काळात आपली हौसमौज महत्त्वाची नसते तर देश अन् देशाची स्थिती खूप महत्त्वाची ठरते, हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या आगळ्यावेगळ्या विवाहची चर्चा मात्र सय्यदपिंप्री गावात चांगलीच रंगली.
 

Web Title:  ... when marrige the shade of the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.