मोबाईल बंदी असताना स्मार्ट घड्याळाचा वापर भाजपा कार्यकर्त्याला भोवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:03 PM2019-05-23T12:03:23+5:302019-05-23T12:04:12+5:30
मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरावर बंदी असून पोलिसांनी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मतमोजणीपुर्व स्पष्ट सूचना दिल्या होत्या.
नाशिक : येथील अंबड गुदामात लोकसभा निवडणूकीच्या नाशिक, दिंडोरी मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, मतमोजणी केंद्रात मोबाईलवर बंदी असतानाही भाजपाच्या एका कार्यकर्त्याने मोबाईलऐवजी स्मार्ट घड्याळाचा वापर केल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी त्यास अटक केली असून मतमोजणी केंद्रातील कार्यक र्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. हा कार्यकर्ता स्मार्ट घड्याळाचा वापर करत बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना माहिती पुरवित होता, असे पोलिसांनी सांगितले.
मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरावर बंदी असून पोलिसांनी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मतमोजणीपुर्व स्पष्ट सूचना दिल्या होत्या. कार्यकर्त्यांनी मोबाईल वापर केला नसला तरी एक कार्यकर्ता मात्र चक्क स्मार्ट घड्याळाचा वापर करत मतमोजणी केंद्रातून बाहेर माहिती पुरविताना पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. भाजपाचा कार्यकर्ता नेमका कोण होता? ते अद्याप पोलिसांनी सांगितलेले नाही.