नर्गिस फाक्री जेव्हा ड्रेसच्या ओङयाने वाकली..

By admin | Published: September 13, 2014 10:44 PM2014-09-13T22:44:35+5:302014-09-13T22:44:35+5:30

अलीकडे प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘किक’ सिनेमात केलेल्या आयटम डान्समुळे नर्गिस फी विशेष लक्षात राहिली.

When Nargis Fakhri was bitten by the dress. | नर्गिस फाक्री जेव्हा ड्रेसच्या ओङयाने वाकली..

नर्गिस फाक्री जेव्हा ड्रेसच्या ओङयाने वाकली..

Next


नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीस आठवडा उरलेला असतानाच या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील १५ पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक उद्या (दि. १४) होणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे आरक्षणाच्या चमत्काराने चार पंचायत समित्यांचे सभापतिपद निवडणुकीआधीच बिनविरोध झाले आहे.
आरक्षणामुळे नाशिक पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या मंदाबाई निकम या एकमेव महिला इतर मागास प्रवर्गातील असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. तीच बाब येवला पंचायत समितीबाबत असून, येवला पंचायत समितीत अनुसूचित जाती संवर्गासाठी आरक्षण निघाल्याने आणि या संवर्गातून एकमेव पंचायत समिती सदस्य म्हणून प्रकाश वाघ निवडून आलेले असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्यासारखीच आहे. 

त्याचप्रमाणे नांदगाव पंचायत समितीचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला राखीव झाल्याने येथून या संवर्गातील कमलताई सोनवणे या एकमेव निवडून आलेल्या असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड होणार आहे. त्याचप्रमाणे सुरगाणा पंचायत समितीत अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निघाल्याने आणि माकपचे बहुमत असल्याने माजी आमदार पुत्र इंद्रजित गावित यांचीही बिनविरोध निवड होणार आहे. देवळा व मालेगाव पंचायत समितीसाठी खुले आरक्षण असल्याने येथे सभापतिपदासाठी चुरस आहे, तर निफाड पंचायत समितीचे आरक्षण इतर नागरिकांच्या प्रवर्गासाठी निघाले असून, या संवर्गातून सुभाष कराड, सोपान खालकर व अनिल बोरस्ते यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
 
अशी होईल निवडणूक
सकाळी ११ ते दुपारी १ सभापती/उपसभापतिपद उमेदवारी अर्ज वाटप, दुपारी १ ते १.१५ अर्ज छाननी, १. १६ ते १.३० उमेदवारी अर्ज माघारीसाठी मुदत, दुपारी १. ३० नंतर मतदानाची आवश्यकता असल्यास मतदान, एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास हात उंचावून मतदान घेण्यात येईल.
नाशिकला चुरस
नाशिक पंचायत समिती सभापतिपदासाठी नसली तरी उपसभापतिपदासाठी मात्र कमालीची चुरस वाढली आहे. विद्यमान पंचायत समिती सभापती अनिल ढिकले हे मनसेच्या दोन, कॉँग्रेसचे त्यांच्यासह दोन व एका शिवसेनेच्या सदस्यासह आठवडाभरापूर्वीच सहलीला गेले आहेत. उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून धनाजी पाटील इच्छुक असले तरी त्यांना बहुमतासाठी संख्याबळ ५ जमविता नाकीनव येत आहे. त्यामुळे उपसभापतिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

Web Title: When Nargis Fakhri was bitten by the dress.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.