वडबारे येथे दरड कोसळते तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:15 AM2021-07-30T04:15:23+5:302021-07-30T04:15:23+5:30
गुरुवारी वडबारे येथे हे मॉक ड्रिल राबवण्यात आले. यावेळी घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रदीप पाटील, प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, ...
गुरुवारी वडबारे येथे हे मॉक ड्रिल राबवण्यात आले. यावेळी घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रदीप पाटील, प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, गटविकास अधिकारी महेश पाटील, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपअभियंता संजय मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, मुख्याधिकारी अभिजित कदम, उपअभियंता विजय कोळी, संजय कुमठेकर, डी.एम. गवारे आदींसह चांदवड येथील सोमा टोल कंपनीचे अग्निशामक दल, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, दूरसंचारचे कर्मचारी, शिक्षण विभाग आदी अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धावत येतात. सायरन वाजवीत रुग्णवाहिका, अग्निशामकची वाहने हजर होतात. दरड कोसळल्याची वार्ता वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरते. जेसीबीसह आवश्यक सर्व साधने बोलावली जातात. अखेर आपत्ती काळातील उपाययोजनांची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) असल्याचे समजताच सारेच जण सुटकेचा नि:श्वास सोडतात. यावेळी वडबारे येथील सरपंच ताईबाई आहेर व ज्येष्ठ नागरिक बापू आहेर यांनी मागील काळात वडबारे येथील आपत्तीबाबत व प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या मदतीबाबत माहिती दिली.
कोट....
सद्य:स्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यात मान्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणात होत असून, त्यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रामध्येदेखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी, तसेच पिकांचे नुकसान झाले आहे. यापुढेही मोठ्या प्रमाणात पर्जन्यमानाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. त्यादृष्टीने तालुका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष व तालुका प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांनी आपत्तीच्या अनुषंगाने काळजी घ्यावी.
-प्रदीप पाटील, तहसीलदार
फोटो- २९ वडबारे
चांदवड तालुक्यातील वडबारे येथे दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर सारी यंत्रणा घटनास्थळी उपस्थित झाली.
290721\29nsk_34_29072021_13.jpg
फोटो- २९ वडबारे चांदवड तालुक्यातील वडबारे येथे दरड कोसळ्ल्याची माहितीनंतर सारी यंत्रणा घटनास्थळी उपस्थित झाली