समको बॅँकेचा सायरन अचानक वाजतो तेव्हा... पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी : ज्येष्ठ संचालकांसह कर्मचाºयांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:14 AM2018-02-09T01:14:55+5:302018-02-09T01:15:32+5:30
सटाणा : वेळ रात्री १ वाजून ३० मिनिटे, सटाणा मर्चंट्स बँकेचा आपत्कालीन सायरन अचानक वाजू लागल्याने बँकेचा सुरक्षारक्षक तातडीने सैरावैरा पळत सुटतो.
सटाणा : वेळ रात्री १ वाजून ३० मिनिटे, सटाणा मर्चंट्स बँकेचा आपत्कालीन सायरन अचानक वाजू लागल्याने बँकेचा सुरक्षारक्षक तातडीने सैरावैरा पळत सुटतो. कधीही न ऐकलेला सायरन जोरजोरात वाजू लागल्यामुळे परिसरातील नागरिक जागे होऊन बँकेकडे धाव घेतात. पोलिसांना घटनेचे माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल होतो. बँकेच्या कर्मचाºयांना आणि संचालक मंडळातील काही संचालकांना उपस्थितांनी या प्रकाराची माहिती दिल्याने तीन-चार संचालकही मध्यरात्री बँकेत येतात. बँक उघडून पोलीस मोठ्या हिमतीने पिस्तूल घेऊन बँकेत जातात; मात्र बँकेत कोणीही आढळून न आल्याने पोलीस सुटकेचा नि:श्वास सोडतात. बँकेत कोणीही नसताना बँकेचा कॅश रूममधील आपत्कालीन सायरन वाजलाच कसा? याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत बँकेचे सीसीटीव्ही तपासण्याचा निर्णय पोलीस घेतात. आणि अखेर बँकेच्या कॅशरूममधील खिडकीच्या फुटलेल्या काचेतून मांजर आत शिरल्याने सायरन वाजल्याचे निष्पन्न होते आणि सुरू झालेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम मिळतो. मात्र लाखो रुपयांची रोकड आणि ग्राहकांच्या लॉकरमध्ये मोठ्या प्रमाणावर दागिने असलेल्या अतिसुरक्षित रूमच्या काचा फुटलेल्या असतानाही बँकेने केलेल्या दुर्लक्षामुळे पोलीस अधिकारी बँक व्यवस्थापनावर संताप व्यक्त करतात; मात्र उद्या तत्काळ यामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन बँक व्यवस्थापनाने दिल्याने दोन तासांनी पोलीस बँकेतून माघारी फिरतात.