एमआयडीसीचा शिक्का निघणार कधी?

By admin | Published: August 19, 2014 11:06 PM2014-08-19T23:06:57+5:302014-08-20T00:45:54+5:30

सातबारा : झोडगेतील शेतकऱ्यांचा सवाल

When the seal of MIDC? | एमआयडीसीचा शिक्का निघणार कधी?

एमआयडीसीचा शिक्का निघणार कधी?

Next

झोडगे : येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहत लोककल्याणकारी राज्य शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेऊन अनेक दिवस झाले. विधानसभेच्या निवडणुका येत असताना शासनाने महाराष्ट्र औद्योगिक वसाहत रद्दच्या निर्णयाची अधिकृत सूचना न काढल्याने शेतकऱ्यांच्या सातबारावरील एमआयडीसीचा शिक्का अजूनही हटत नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.
शासनाने घेतलेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करून सातबारावरील एमआयडीसीचे शिक्के उठवण्यात यावेत, अशी मागणी सरपंच दीपक देसले यांनी केली
आहे.
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून झोडगे एमआयडीसी रद्दचा निर्णय घेतला; पण अनेक दिवस उलटूनही सातबारा वरील शिक्के हटत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे खरेच असा निर्णय
झाला असेल तर त्याच्या अंमलबजावणीचे अध्यादेश काढून सातबारावरील एम. आय. डी. सी. चे शिक्के उठवण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: When the seal of MIDC?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.