नाशिकचा महामार्ग बसस्थानक मोकळा श्वास केव्हा घेणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:09 PM2018-05-04T12:09:54+5:302018-05-04T12:09:54+5:30

महामार्ग बसस्थानकालगतच्या रस्त्यावरच खासगी बसेसचा गरडा

When will the bus station of breathing of Nashik Highway take place? | नाशिकचा महामार्ग बसस्थानक मोकळा श्वास केव्हा घेणार ?

नाशिकचा महामार्ग बसस्थानक मोकळा श्वास केव्हा घेणार ?

Next
ठळक मुद्दे महामार्ग बसस्थानकालगतच्या रस्त्यावरच खासगी बसेसचा गरडा

इंदिरानगर - मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकात खासगी बसेस व प्रवासी वाहनचालकांचा विळखा पडला असून त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत चालली आहे.
इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, सार्थकनगर, सराफनगर, किशोरनगर यासह परिसरातील विविध उपनगरातील नागरिकांना शहरात नोकरी आणि व्यवसायासाठी समांतर रस्त्यावरून महामार्ग बसस्थानक मार्गे ये जा करावी लागते. महामार्ग बसस्थानकावरून नगर, मुंबई, कसारा, शिर्डी, सिन्नर, श्रीरामपूर, शेवगाव, नेवासा यासह विविध शहरांना गावाला दररोज बसेस ये जा करीत असतात. त्यामुळे महामार्ग बसस्थानक लगतच्या रस्त्यावर दिवसभर मोठयÞा प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते परंतु महामार्ग बसस्थानका लगतच्या रस्त्यावरच तीन ते चार खासगी बसेस आणि चार ते पाच खासगी वाहने प्रवासी घेण्यासाठी तासनतास रस्त्यावरच उभी राहात असतात. त्यामुळे रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत आहे. खासगी प्रवासी वाहने नियमाची पायमल्ली करीत असतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

 

Web Title: When will the bus station of breathing of Nashik Highway take place?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक