साधुग्राममधील अतिक्रमण हटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:14 AM2021-07-26T04:14:01+5:302021-07-26T04:14:01+5:30

बँक खाते उघडण्याची डोकेदुखी नाशिक : दीडशे रुपयांसाठी विद्यार्थ्यांना हजार रुपयांचे बँक खाते सक्तीचे केले आहे. त्यामुळे पालकांच्या चिंता ...

When will the encroachment in Sadhugram be stopped? | साधुग्राममधील अतिक्रमण हटणार कधी?

साधुग्राममधील अतिक्रमण हटणार कधी?

Next

बँक खाते उघडण्याची डोकेदुखी

नाशिक : दीडशे रुपयांसाठी विद्यार्थ्यांना हजार रुपयांचे बँक खाते सक्तीचे केले आहे. त्यामुळे पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. बँक खाते उघडणे अनेक पालकांना परवडणारे नसून हा क्लिष्ट निर्णय शासनाने रद्द करावा, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटना तसेच पालकवर्गाकडूनही केली जात आहे. अजूनही अनेकांचे खाते उघडणे बाकी आहे.

पाऊस आला, गढूळ पाणी आले

नाशिक : पाऊस सुरू झाल्यानंतर शहरात अनेक भागात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. जुने नाशिक, पेठरोड तसेच द्वारका झोपडपट्टी परिसरात गढूळ पाणीपुरवठा होऊ लागला आहे. पेठरोडला अनेक नागरी वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी युक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. जुूने नाशिक तसेच वडाळागाव परिसरातूनही गढूळ पाण्याच्या तक्रारी आहेत.

व्यवसाय शिक्षक अडचणीत

नाशिक : समग्र शिक्षा अभियान यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे व्यवसाय शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

व्यवसाय शिक्षकांना देण्यात येणारे मानधन हे गेल्या दहा महिन्यांपासून दिले गेलेले नाही. व्यवसाय शिक्षकांच्या या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अनेकदा चर्चा होऊनही निर्णय न झाल्याने उपोेषणाचा इशारा महासंघाने दिला आहे.

मनपा बसेस ओझरपर्यंत आणावी

नाशिक : नाशिक शहरातून ओझर येथे एचएएल कारखान्यात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने सीएनजी बससेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष उमेश रतनराव जाधव यांनी कंपनीचे सीएमडी तथा आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन दिले आहे. एचएएल कारखान्यात सुमारे २,२०० अधिकारी, कर्मचारी नाशिक शहरातून ये-जा करतात, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: When will the encroachment in Sadhugram be stopped?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.