नांदगाव-येवला रस्त्याचे भाग्य कधी उजळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:14 AM2021-05-19T04:14:18+5:302021-05-19T04:14:18+5:30
कौळाणे-नांदगाव- येवला हायब्रिड अन्युईटी रस्त्याचे, नांदगाव येवला टप्प्यातले काम दोन वर्षांपासून अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.. हायब्रिड अन्युईटी अंतर्गत ...
कौळाणे-नांदगाव- येवला हायब्रिड अन्युईटी रस्त्याचे, नांदगाव येवला टप्प्यातले काम दोन वर्षांपासून अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.. हायब्रिड अन्युईटी अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण कांमासाठी १२० कोटी रुपये खर्चास मंजुरी मिळून दोन वर्ष झाली. कौळाणे ते नांदगाव दरम्यान रस्त्याची बहुतांश कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. येवला ते नांदगाव रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. कधी कामे सुरू तर कधी बंद असतात. नांदगाव-येवला ४० किलोमीटर रस्त्याच्या कामाची मुदत फेब्रुवारी २०२१ ला संपली असून, बांधकाम कंपनीला पुन्हा ६ महिन्याची मुदत वाढवून दिली आहे सदर रस्त्याची रुंदी १२ मीटर आहे. पुलाच्या ठिकाणी अरुंद ९ मीटर रस्ता आहे. काम सुरू असलेल्या भागात दिशादर्शक फलक किंवा सूचना फलक लावले नाहीत. वाळूने भरलेल्या गोण्या ठेवल्या नाहीत. कौळणे फाटा -नांदगाव - येवला रस्त्यावर १२१ मोऱ्या ( छोटे पूल) असून रस्ता रुंदीकरण कामासोबतच अंदाज पत्रकापैकी फक्त १३ पुलांचे रुंदीकरण कामाचाच समावेश करण्यात आला आहे. येवला-नांदगाव रस्त्याचे काम सुरू असताना बांधकाम कंपनीने या पुलाची मोजणी करून आवश्यक तेथे पूल रुंदीकरण करण्यासाठी बांधकाम विभागाकडे प्रस्ताव मांडला आहे . १२१ पैकी ३४ ते ३८ मोऱ्यांची रुंदीकरणाची कामे व नवीन अतिरिक्त कामे करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यावर या मोऱ्यांची रुंदीकरणाची कामे केली जातील. जोपर्यंत या पुलांची कामे होत नाही तोपर्यंत या ठिकाणी दिशादर्शक फलक, रेडिमेड लावलेले ड्रम ठेवावेत व रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.
कोट....
लोनच्या तांत्रिक अडचणीमुळे कंपनीकडून काम पूर्ण झाले नाही. काम डेडलाईनपर्यंत पूर्ण न झाल्याने कंपनीला दोन कोटींचा दंड आकारला आहे व त्यांना पुढे सहा महिन्यांची मुदत वाढ दिली आहे. ३४ ते ३८ मोऱ्यांचे रुंदीकरणाची अतिरिक्त कामे म्हणून केली जाणार आहेत.
- वाय. ए. पाटील, उपअभियंता, सा. बां. विभाग, नांदगाव
फोटो - १८ नांदगाव ॲक्सिडेंट
रस्त्यावर फणसे मळा येथे अरुंद पुलाजवळ दिशादर्शक फलक नसल्याने ऊसतोड मजुरांना घेऊन जाणार अपघातग्रस्त ट्रॅक्टर.
===Photopath===
180521\18nsk_6_18052021_13.jpg
===Caption===
फोटो - १८ नांदगाव ॲक्सीडेंटरस्त्यावर फणसे मळा येथे अरुंद पुलाजवळ दिशादर्शक फलक नसल्याने ऊसतोड मजुरांना घेऊन जाणार अपघातग्रस्त ट्रॅक्टर.