मनमाड शटल कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:19+5:302021-06-28T04:11:19+5:30

नाशिक : कोराेना निर्बंधांचे पालन करीत केवळ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी काही रेल्वे गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक राज्यात ...

When will the Manmad shuttle start? | मनमाड शटल कधी सुरू होणार?

मनमाड शटल कधी सुरू होणार?

Next

नाशिक : कोराेना निर्बंधांचे पालन करीत केवळ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी काही रेल्वे गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक राज्यात कोरोनाचा कमी-अधिक धोका असल्याने निर्बंधदेखील त्या प्रमाणात आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसेाय होत असून बंद असलेल्या गाड्या कधी सुरू होणार, असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे.

नाशिक रोड रेल्वे स्थानकातून दररोज दोन्ही बाजूंनी १२२ गाड्या सुरू आहेत. त्यामध्ये ४५ गाड्या या दैनंदिन धावतात तर उर्वरित गाड्या या आठवड्यातील काही दिवसच धावतात.

जिल्ह्यातील नागरिकांसाठी असलेली शटल सेवा ही विनाआरक्षित असल्यामुळे स्थानिकांसाठी या गाड्या सुरू करण्याची मागणी सातत्याने होत आहे. पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाल्याने मुंबईला जाणाऱ्यांची सोय झाली असली तरी आता मनमाड-इगतपुरी दरम्यान असलेली शटल गाडी कधी सुरू होणार, असा प्रश्न नाशिककर नागरिक उपस्थित करू लागले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या पॅसेंजर गाड्यादेखील अद्यापही सुरू करण्यात आलेल्या नाहीत. ज्या गाड्या सुरू आहेत त्या ठरावीक ठिकाणीच थांबतात तर बंद असलेल्या गाड्या निर्बंधासह सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

---इन्फो--

सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्या

पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, पंजाब मेल, राजधानी एक्स्प्रेस. हरिद्वार एक्स्प्रेस, मुंबई-हावडा मेल, कलकत्ता मेल, गीतांजली, विदर्भ एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस, देवगिरी, तपोवन, पटना सुपरफास्ट, जनता एक्स्प्रेस, महानगरी, काशी, गोरखपूर, गुवाहटी एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, भागलपूर एक्स्प्रेस.

--इन्फो--

कधी सुरू होणार या गाड्या?

गोदावरी एक्स्प्रेस, मनमाड-इगतपुरी शटल, देवळाली-भुसावळ शटल, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, भुसावळ-पुणे पॅसेंजर, मुंबई अमरावती, नंदिग्राम, सेवाग्राम.

--इन्फो--

पॅसेंजर गाड्यांचे घोडे कुठे अडले?

कोरोना महामारीमुळे रेल्वे प्रशासनाने सर्वसाधारण तिकीट बंद केले असून फक्त कन्फर्म आरक्षण तिकीट असणाऱ्या प्रवाशाला प्रवासासाठी परवानगी दिलेली आहे. पॅसेंजर गाड्यांना आरक्षण तिकीट नसल्याने सर्वसाधारण (जनरल) तिकीट आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन जोपर्यंत सर्वसाधारण जनरल तिकीट सुरू करण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत पॅसेंजर गाड्या सुरू होणार नाहीत, अशी सद्य:स्थिती आहे. जागतिक आरोग्य यंत्रणा व केंद्रीय आरोग्य विभाग जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत पॅसेंजर रेल्वे सुरू होणार नाहीत.

--इन्फो--

प्रवासी काय म्हणतात????

Web Title: When will the Manmad shuttle start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.