विजेचे जीर्ण खांब बदलणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:59 PM2020-01-19T22:59:40+5:302020-01-20T00:12:01+5:30

विविध भागातील विजेचे खांब जीर्ण झाले असून, पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यापासून ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज भावसार यांच्यासह येथील दुकानदार व रहिवाशांनी केली आहे.

When will the poles of electricity change? | विजेचे जीर्ण खांब बदलणार कधी?

विजेचे जीर्ण खांब बदलणार कधी?

googlenewsNext
ठळक मुद्देलासलगाव : ग्रामस्थांचा सवाल; महावितरण विभागाचे दुर्लक्ष

लासलगाव : येथील झेंडा चौक, बाजारपेठ, शनिमंदिर यासह विविध भागातील विजेचे खांब जीर्ण झाले असून, पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यापासून ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज भावसार यांच्यासह येथील दुकानदार व रहिवाशांनी केली आहे.
परिसरात जेव्हा वीजवाहिनीमध्ये बिघाड होतो तेव्हा महावितरणचे कर्मचारीसुद्धा खांबवर चढण्यास घाबरतात. हे जीर्ण खांब बदलणे किंवा वीजवाहिनी भूमिगत करण्याची मागणी नागरिकांनी केली
आहे. गणपती विसर्जन मिरवणूक व धार्मिक उत्सव मिरवणूक मार्गावरील खांब गंजले आहेत. तसेच घरांजवळून सदर खांबांवरील वीजवाहिनी जाते. जीर्ण खांबांमुळे जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दुर्घटना होण्यापूर्वी वितरण विभागाने खांब बदलावे किंवा वीजवाहिनी भूमिगत करावी, अशी मागणी राहिवाशांनी केली आहे.
काही ठिकाणी गंजलेले विद्युतखांब तशाच स्थितीत उभे असताना वाहिन्यांवर झेपावलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याच्या कामाकडेही महावितरण दुर्लक्ष करत आहे. या जीर्ण खांबांवर लगतच्या झाडांच्या फांद्यांनी अतिक्रमण केले आहे. बाजारपेठेतील गजबजलेल्या ठिकाणची ही स्थिती आहे. जीर्ण विजेचे खांब बदलणार कधी, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: When will the poles of electricity change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार