शेतक-यांसाठी "धन की बात" केव्हा करणार? - विरोधक

By Admin | Published: April 18, 2017 04:14 PM2017-04-18T16:14:22+5:302017-04-18T16:14:22+5:30

शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यासाठी सरकारने आता अधिक अंत पाहू नका अन्यथा आता रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिला आहे

When will "riches talk" to farmers? - The opponent | शेतक-यांसाठी "धन की बात" केव्हा करणार? - विरोधक

शेतक-यांसाठी "धन की बात" केव्हा करणार? - विरोधक

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 18 - शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यासाठी सरकारने आता अधिक अंत पाहू नका अन्यथा आता रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिला आहे. विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 
 
संघर्ष यात्रेमुळे मुख्यमंत्र्यांना "मन की बात" करावी लागत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी "धन की बात" केव्हा करणार?, असा प्रश्नही विखे पाटील यांनी केला. शेतकरी हितासाठी प्रसंगी पोलिसांनी गोळ्या झाडल्या तर त्या गोळ्याही खाऊ, असे यावेळी अबू आजमी म्हणाले.
 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, जोगेंद्र कवाडे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: When will "riches talk" to farmers? - The opponent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.