ग्रामीण बस वाहतूक होणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:47+5:302021-07-14T04:17:47+5:30
समाजकल्याण कर्मचाऱ्यांना मिळणार प्रशिक्षण नाशिक : यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण ...
समाजकल्याण कर्मचाऱ्यांना मिळणार प्रशिक्षण
नाशिक : यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे यांच्या वतीने राज्यातील समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाचे पायाभूत प्रशिक्षण ऑनलाइन देण्यात येणार आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमधील कामाचा दर्जा व गुणवत्ता वाढीला लागावी. प्रशासनात गतिमानता व सुधारणा व्हावी. या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात कर्मचारी अधिकारी यांनी देखील काळानुरूप आपल्या कामकाजामध्ये बदल करणे आवश्यक असून, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच त्याचे प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे बाब लक्षात घेत त्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत.
ओझर विमानतळाबाबत गोडसे यांना निवेदन
नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ नामकरण समितीच्या वतीने खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. ओझर येथील विमानतळाला गायकवाड यांच नाव देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. विमानतळाबाबत दादासाहेब गायकवाड यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावाची शिफारस करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. शिष्टमंडळात समितीचे मुख्य निमंत्रक अण्णासाहेब कटारे, विलास पवार, बाळासाहेब शिंदे, दीपचंद दोंदे, मदन शिंदे, आदेश पगारे, बाळासाहेब साळवे, किशोर गांगुर्डे, पंडित नेटावटे, प्रशांत कटारे, प्रांतिक सोनटक्के, बिपीन कटारे आदी उपस्थित होते.
120721\12nsk_43_12072021_13.jpg
ओझर विमानतळाबाबत गोडसे यांना निवेदन