लघुउद्योगाचे कारखाने केव्हा हटणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:01 AM2018-04-21T01:01:13+5:302018-04-21T01:01:13+5:30
श्रीरामनगरमधील भर वस्तीत असलेल्या लघुउद्योगांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. श्रीरामनगरमध्ये बंगले आणि अपार्टमेंट व सोसायटी दिवसागणिक वाढतच आहेत. लोकसंख्याही त्याबरोबर झपाट्याने वाढत आहे.
इंदिरानगर : श्रीरामनगरमधील भर वस्तीत असलेल्या लघुउद्योगांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. श्रीरामनगरमध्ये बंगले आणि अपार्टमेंट व सोसायटी दिवसागणिक वाढतच आहेत. लोकसंख्याही त्याबरोबर झपाट्याने वाढत आहे. सुमारे पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी परिसरात संपूर्ण शेती होती. परंतु जमिनींना जसजसा भाव मिळत गेला तसतशी जमिनींची विक्र ी झाली. बंगल्यासाठी जागा घेताना किंवा अपार्टमेंट किंवा सोसायटीत सदनिका घेताना संबंधित मिळकतधारकांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी लावली आहे आणि स्वत:चे स्वप्नाचे घर तयार केले आहे. सुमारे दहा वर्षांपासून या भर वस्तीत लघुउद्योग सुरू करण्यात आले आहेत. या लघुउद्योग कारखा न्यांतून बाहेर सोडण्यात येणारा धूर हा संपूर्ण परिसरात पसरत असल्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. नाक, घसा, डोळे यांसह शरीराच्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. परिसरातील नागरिकांनी अनेक वेळेस निवेदनाद्वारे व समक्ष भेटून तक्र ारी करूनही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कारवाईची मागणी
भरवस्तीत अनधिकृतपणे लघुउद्योग कसे सुरू आहेत? परिसरातील नागरिकांना घराची दारे-खिडक्या उघडणेसुद्धा प्रदूषणामुळे मुश्कील झाले आहे. प्रदूषणामुळे मोठी आजाराची साथ आल्यावरच कारवाई करणार का, असा सवाल येथील त्रस्त नागरिकांनी केला आहे.