पर्यटन क्षेत्र अनलॉक कधी करणार: तानचे अध्यक्ष राजेंद्र बकरे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 01:06 PM2020-10-16T13:06:13+5:302020-10-16T13:16:39+5:30

नाशिक : (संजय पाठक) पर्यटन हा देशात सर्वधिक चलनवलन निर्माण करणारे क्षेत्र आहे.केवळ टुर्स कंपन्या पुरता हा उद्योग मर्यादीत ...

When will the tourism sector be unlocked: Tan's president Rajendra Bakre's question | पर्यटन क्षेत्र अनलॉक कधी करणार: तानचे अध्यक्ष राजेंद्र बकरे यांचा सवाल

पर्यटन क्षेत्र अनलॉक कधी करणार: तानचे अध्यक्ष राजेंद्र बकरे यांचा सवाल

googlenewsNext


नाशिक: (संजय पाठक) पर्यटन हा देशात सर्वधिक चलनवलन निर्माण करणारे क्षेत्र आहे.केवळ टुर्स कंपन्या पुरता हा उद्योग मर्यादीत नसून ज्या भागात पर्यटन आहे. अशा ग्रामीण अथर्कारणाला त्यातून चालना मिळते. देशात सर्व उद्योग अ?ॅनलॉक होत असताना पर्यटन क्षेत्रच फक्त बंद का असा प्रश्न नाशिकच्या तान
(ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन आॅफ नाशिक) या पर्यटन व्यवसायिकांच्य संघटनेचे
अध्यक्ष राजेंद्र बकरे यांनी केला आहे. ग्रामीण भागाला मोठा आधार असलेला
हा उद्योग शासनाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही बकरे यांनी
केली आहे.

प्रश्न- पर्यटन क्षेत्राच्या सद्यस्थिती विषयी काय सांगाल?
बकरे - देशाच्या अथर्कारणात नव्हे तर जीडीपीत देखील महत्वाचा वाटा
असलेल्या या पर्यटन आणि हॉस्पीटीलीटी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे.
पर्यटन हा मुळातच अत्यावश्यक सेवेचा भाग नाही, असे मानले गेल्याने
लॉकडाऊनचा सर्वात पहिला फटका याच व्यवसायाला बसला. पंतप्रधानांनी देशातील
उद्योग व्यवसाय सावरण्यासाठी २०लाख कोटी रूपयांचे पॅकेज दिले मात्र,
त्यात पर्यटन क्षेत्राचा कोठेही समावेश नाही. एकंदरच शासनाच्या
दृष्टीकोनातून पर्यटन क्षेत्र सर्वाधिक दुर्लक्षीत आहे.

प्रश्न- पर्यटनामुळे कोरोनाची भीती व्यक्त केली जाते...
बकरे- आज पर्यटन क्षेत्राला अधिकृत परवानगी नसतानाही नागरीक लहान मोठ्या ट्रीप काढतच आहेत. त्यात नियमांचे पालन होईलच हे कसे गृहीत धरले जाते? पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यास नागरीकांबरोबरच व्यवसायिक काळजी घेतील आणि सुरक्षा नियमांचे पालन देखील करतील. परंतु हॉटेल्स आणि पर्यटन व्यवसायाला पूणर्त: परवानगी द्यायला हवी. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी देखील केली आहे. परंतु उपयोगझालेला नाही.

प्रश्न- शासनाने नेमके काय करावे असे वाटते?
बकरे- पर्यटन व्यवसाय हा एजंटस पुरता मर्यादीत नाहीत. शेकडो उद्योग
त्यावर अवलंबून आहेत. आज ग्रामीण भागात एखाद्या वनपर्यटनाला गेलेतरी
तेथील किरकोळ खाद्य पदार्थ विकणाऱ्यांची, धार्मिक पर्यटन असेल तर फुल
माळा, पुजेचे साहित्य विकणाºयांची गुजराण पर्यटकांवर होते हे लक्षात
घेतले पाहिजे. दुसरा टोकाचा विचार केला तर देश- विदेशातील पर्यटकांमुळे
विदेशी चलन देखील मिळते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. किमान
सरकारी कमर्चाºयांच्या एलटीएमुळे तरी पर्यटन वाढेल अशी अपेक्षा होती.
मात्र शासनाने त्यांना पर्यटनाऐवजी अन्य खर्चाचा विकल्प दिला आहे,अशा
मारक धोरणामुंळे पर्यटन क्षेत्र कसे टिकेल याचा विचार केला पाहिजे. मिशेन
बिगेन मध्ये अन्य उद्योग आणि व्यवसायांबरोबरच पर्यटन वाढले पाहिजे, याकडे
लक्ष पुरवण्याची गरज आहे.

Web Title: When will the tourism sector be unlocked: Tan's president Rajendra Bakre's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक