कुठे ७० अन् कुठे सव्वादोेनशे शाखा?

By admin | Published: November 19, 2016 12:35 AM2016-11-19T00:35:34+5:302016-11-19T00:37:31+5:30

कुठे ७० अन् कुठे सव्वादोेनशे शाखा?

Where are 70 and where is the Swavadensen Branch? | कुठे ७० अन् कुठे सव्वादोेनशे शाखा?

कुठे ७० अन् कुठे सव्वादोेनशे शाखा?

Next

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या जिल्ह्यात २१३ ठिकाणी शाखा असून, शहरातील शाखा मिळून जवळपास २२० शाखा जिल्हा बॅँकेच्या आहेत. त्यामानाने राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या जिल्हाभरात अवघ्या ७० शाखा असल्याचा दावा जिल्हा बॅँकेच्या संचालकांनी केला आहे. त्यामुळेच जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या जिल्हा बॅँकेलाच ५०० व १००० नोटांची बंदी का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. जिल्हा बॅँकेचे जिल्हाभरात सुमारे पाच लाख सभासद असून, त्यांचाही चलनाचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे सुमारे पाच लाख सभासद शेतकरी असून, त्यांच्या जवळपास ३८०० कोटींच्या ठेवी आहेत. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने आतापर्यंत १७०० कोटींच्या आसपास पीककर्ज व अन्य कर्जांचे वाटप केले आहे. १४ नोव्हेंबरपासून देशभरातील जिल्हा बॅँकांना चलनातून बाद ठरविण्यात आलेल्या ५०० व १०००च्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आल्याने त्याचा थेट परिणाम जिल्हा बॅँकेच्या पीककर्ज वसुलीवर तर झालाच आहे. मात्र वाढू शकणाऱ्या ठेवींवरही झाला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जवळपास ३१२ कोटींची गंगाजळी जिल्हा बॅँकेत सभासदांनी व कर्जदार शेतकऱ्यांनी जमा केली होती. त्यात दिवसागणिक वाढच होत होती. मात्र रिझर्व्ह बॅँकेच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे हा रोख थांबला आहे. हा निर्णय झाला नसता तर आठवडाभरात जिल्हा बॅँकेच्या ठेवीत हजार ते पंधराशे कोटींनी वाढ झाली असती आणि जवळपास ३०० कोटींची पीककर्ज वसुलीही जमा झाली असती, असा दावा संचालक वर्गाने केला आहे. जिल्ह्यात अतिदुर्गम भागातही जिल्हा बॅँकेचे जाळे असताना जिल्हा बॅँकेच्या शाखांना ५०० व १०००च्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालायची आणि ज्या राष्ट्रीयीकृत बॅँका अवघ्या ७० च्या घरात आहे, त्यांना ५०० व १००० च्या नोटा स्वीकारून देण्यास बंदी घालावी, हा रिझर्व्ह बॅँकेचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा संचालकांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Where are 70 and where is the Swavadensen Branch?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.