कुठे नेऊन ठेवला भाजपा माझा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:46 AM2017-10-28T00:46:20+5:302017-10-28T00:46:27+5:30

सत्ता नसते तेव्हा सारे शांत असते आणि सत्ता आली की सारे अशांत होते असा अनुभव सध्या नाशिकमधील भाजपा घेत आहेत. पक्षातील नव्या-जुन्यांचा वाद, त्यात नवागतांनी पक्षावर मिळवलेला ताबा, स्थानिक आमदारांमधील द्वंद्व या साºया प्रकारांमुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, कोठे नेऊन ठेवला भाजपा माझा, असे म्हणण्याची वेळ निष्ठावंतांवर आली आहे.

 Where is the BJP put me? | कुठे नेऊन ठेवला भाजपा माझा?

कुठे नेऊन ठेवला भाजपा माझा?

Next

नाशिक : सत्ता नसते तेव्हा सारे शांत असते आणि सत्ता आली की सारे अशांत होते असा अनुभव सध्या नाशिकमधील भाजपा घेत आहेत. पक्षातील नव्या-जुन्यांचा वाद, त्यात नवागतांनी पक्षावर मिळवलेला ताबा, स्थानिक आमदारांमधील द्वंद्व या साºया प्रकारांमुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, कोठे नेऊन ठेवला भाजपा माझा, असे म्हणण्याची वेळ निष्ठावंतांवर आली आहे.  शिस्तबद्ध पक्ष म्हणून भाजपाची असलेली ओळख केव्हाच लयास गेली आहे. कॉँग्रेस आणि अन्य पक्षांशी लढता लढता त्यांचे गुण तर पक्षात आलेच; शिवाय त्याच पक्षातील नेतेही आता पक्षात आल्याने ओरिजनल भाजपाई शोधण्याची वेळ आली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत तर चार सदस्यीय प्रभागात दोन ओरिजनल आणि दोन नवे परपक्षीय असे धोरणच म्हणे भाजपाने राबवून राजकारणात आदर्श समतोलाचे उदाहरण दाखवले होते. त्याचवेळी वादांच्या ठिणग्या उडत होत्या. परंतु आता त्या ठिणग्यांनी पक्षालाच आग लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजपातील तीन आमदारांचे एक एकात नाही. तिघा आमदारांची त्रिमूर्ती स्थिती झालेली. त्यात एका अपक्ष आमदाराची पक्षात भर पडली. आधीच मूळ नेत्यांमध्ये वर्चस्ववाद त्यात अन्य पक्षांतील आजी- माजी आमदार नेते आणि त्यांच्या समर्थकांची भर पडली. त्यामुळे काय होणार, ज्यांनी मार्गदर्शन करावे किंवा ज्यांचा धाक होता असे नेते पक्षात नाहीत किंवा हयातही नाहीत, तर काही मार्गदर्शक मंडळावरील सदस्यांप्रमाणे मखरात बसवलेले आहेत. साहजिक गेल्या दोन ते तीन वर्षांत जे काही सुप्त संघर्ष होते तेच आता उघडपणे चव्हाट्यावर आले आहेत. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या हाती स्थानिक आणि महापालिकेची सत्ता एकवटल्यानंतर अन्य नाराजांना पक्षश्रेष्ठींचा आधार शोधावा लागला. स्थानिक पातळीवर एक निर्णय घेतला की राज्यस्तरावरून त्याला स्थगित करायचे या वादामुळे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हास्तरावरील डझनभर समित्यांना मुहूर्त लागलेला नाही. बळी तो कान पिळी या उक्तीनुसार विशेष कार्य अधिकाºयासारखी पदे एकाच नेत्याच्या आणि आमदारांच्या घरातही दिली गेली, पण कार्यकर्त्यांना पुरेशी संधी मिळालेली नाही. त्यात गटबाजीचे सध्या दिसत असलेले दर्शन बघून भाजपा कार्यालयात पहिले राष्टÑ.. अंत स्वयं... ही घोषणा खुंटीलाच टांगल्याचा प्रत्यय येतो आहे.  एका पक्षातील वादाची कारणे तरी किती? जनसामान्यांसाठी उपयुक्त ठरावे अशा एका कल्याणकारी महिला रुग्णालयाचे स्थान कोणते असावे यासाठी दोन आमदारांमध्ये जो प्रतिष्ठेचा प्रश्न सुरू आहे त्यातून सर्वसामान्यांची परवड होत आहे त्याचे काय, याचा विचारही कोणी करताना दिसत नाही.
मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय मतास टाकावा लागतो आणि त्यांनी निकाल दिल्यानंतरही विरोध होत असेल तर मग पक्षाचे स्थानिक नेते ऐकणार तरी कोणाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वर्षांवर विधानसभा निवडणुका आल्या असून, त्यासाठी आताच रणशिंग फुंकले जाण्याची चिन्हे असली तरी ही निवडणूक लढविणार तरी कोणाच्या भरवशावर, असा प्रश्न आहे. कारण ज्यांच्या भरवशावर निवडणूक लढवावी असे समर्पित कार्यकर्ते केव्हाच अंतर्धान पावले आहेत.

Web Title:  Where is the BJP put me?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.