भाजपाकडे पैसा आला कोठून? - निखिल वागळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:41 AM2018-10-15T00:41:06+5:302018-10-15T00:41:38+5:30

सध्या भाजपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जाहीरातींवर खर्च करण्यात येत आहे. हा पैसा कोठून आला याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले.

Where did the BJP come from? - Nikhil Wagle | भाजपाकडे पैसा आला कोठून? - निखिल वागळे

भाजपाकडे पैसा आला कोठून? - निखिल वागळे

googlenewsNext

विंचूर : सध्या भाजपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जाहीरातींवर खर्च करण्यात येत आहे. हा पैसा कोठून आला याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले.
विंचूर येथे आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेत ‘प्रसारमाध्यमे स्थिती आणि वस्तुस्थिती’ या विषयावर चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैयासाहेब देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, मुधकर कड उपस्थित होते.
वागळे पुढे म्हणाले, मोबाइलमुळे जगात मोठी क्रांती झाली असून, जगभरात काय सुरू आहे ते आपल्याला समजत असल्याने अवघे जग हातात आले आहे. त्यामुळे ही क्रांती आणि समाजमाध्यमे समजून घेणे गरजेचे आहे. मोबाइल वापरासाठी प्रगल्भता असावी लागते. यावेळी वागळे यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. मोदींविरोधी बोलणाऱ्या बुद्धिवादी लोकांना दहशतवादी ठरवले जाते की काय, असा प्रश्न उपस्थित करून माध्यमांनी आवाज उठविला पाहिजे मात्र तसे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सध्या माध्यमांची मूल्ये पायदळी तुडवली जात असून, त्यासाठी मीडियावर वाचक, प्रेक्षकांचा दबाव गट असणे गरजेचे आहे. जनता सार्वभौम आहे. यासाठी माध्यमे माहितीचा स्रोत बनायला हवी, असेही ते म्हणाले.
भुजबळ आणि वागळे एकाच व्यापीठावर कसे ?
आमदार छगन भुजबळ आणि मी एकाच व्यासपीठावर येणार हे मला व्याख्यानाच्या दिवशी सकाळी समजले असे सांगुन मी राजकीय अस्पृश्यता मानत नसल्याचे वागळे म्हणाले. उद्या भाजपवाले प्रश्न करतील वागळे भुजबळांबरोबर गेले कसे? त्यासाठी मी आधीच खुलासा करतो की, मी जर देवेंद्र फडणवीस यांसह भाजपच्या अनेक नेत्यांबरोबर व्यासपीठावर जाऊ शकतो, तर भुजबळांबरोबर का नाही. भुजबळांवर जसे आरोप आहेत तसेच अनेक भाजपाच्या मंत्र्यांवरही आरोप आहेत. मात्रअद्याप ते सिद्ध झालेले नाहीत. बहुजन नेत्यांना टार्गेट करु न तुरु ंगात टाकले जात असून, सिंचन घोटाळे करणारे अद्यापही बाहेर कसे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राहुल गांधींचा हेतु चांगला
राहुल गांधी हा माणूस खुन्शी वाटत नाही. त्यांचा हेतू चांगला वाटतो. राजकारणात यशस्वी होईल की नाही माहित नाही, पण प्रामाणीक व्यक्ती आहे. चार वर्षात द्वेष पसरवण्याचे जे काम झालं ते राहुल गांधी यांच्याकडून होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Where did the BJP come from? - Nikhil Wagle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.