२० लाख कोटींचे पॅकेज गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:55 AM2020-07-25T00:55:10+5:302020-07-25T01:14:55+5:30

लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज देशासाठी जाहीर केले. मात्र राज्यात सदरचे पॅकेज कुठेच दिसले नाही. मग हे पॅकेज गेले कुठे, असा सवाल राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला. कोरोना काळात विरोधकांनी राजकारण करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

Where did the Rs 20 lakh crore package go? | २० लाख कोटींचे पॅकेज गेले कुठे?

२० लाख कोटींचे पॅकेज गेले कुठे?

Next
ठळक मुद्देशरद पवार यांचा सवाल; कोरोना काळात राजकारण करू नये

नाशिक : लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज देशासाठी जाहीर
केले. मात्र राज्यात सदरचे पॅकेज कुठेच दिसले नाही. मग हे पॅकेज गेले कुठे, असा सवाल राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला. कोरोना काळात विरोधकांनी राजकारण करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. पवार यांनी कोरोना उपाययोजना शुक्रवारी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नाशिकला आरोग्य विज्ञान विद्यापीठ असतांना येथील डॉक्टर्स उपचारासाठी पुढे येत नसतील तर हे लक्षण चांगले नाही. कोरोना महामारीच्या काळात खासगी डॉक्टर्स पुढे येत नसल्याच्या तक्रारी आहेत. ते स्वत:हून पुढे येत नसतील तर त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनास देण्यात आल्या असल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी पवार म्हणाले, महाराष्टÑ, तामिळनाडू, दिल्ली व कर्नाटक राज्यांमध्ये कोरोना अधिक आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. मुंबईचे चित्र बदलू लागले आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. टेस्टिंग वाढवली की, रुग्णसंख्या वाढलेली दिसते. त्यामुळे पुरेशा खाटा उपलब्ध असाव्यात अशा सूचना देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. पवार पुढे म्हणाले, खाटा व अधिकाऱ्यांची संख्या पाहता प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंध औषधे खरेदीचे अधिकार जिल्हा प्रशासनास देण्यात आल्याचे सांगितले.
लॉकडाऊन करताना आर्थिक परिस्थितीही विचारात घ्यावी, असे मत व्यक्त करून नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर हे महत्त्वाचे केंद्र असून, येथील कारखाने सुरू होत आहेत. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते.
राजकारणापेक्षा काम महत्त्वाचे
केंद्र सरकारच्या आरोग्याच्या तीन योजनांसाठी काही प्रमाणात राज्याला निधी मिळाला असला तरी केंद्राचे पॅकेज राज्यात दिसले नाही. कोरोनात राजकारण न करता महाराष्टÑाचे आपण काही देणे लागतो ही भावना प्रत्येक राजकीय व्यक्तीने बाळगणे महत्त्वाचे असल्याचे सांगून, पवार यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अगोदर शरद पवार यांनी आढावा बैठक घेतल्याबाबत होणाºया चर्चेला पवार यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, रुग्ण वाढल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे मुंबई येथील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:च आरोग्यमंत्री, प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेवरून आढावा घेऊन येणाºया अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्री ठाकरे हेदेखील नाशिक येथे बैठक घेणार असून, आजच्या बैठकीची त्यांनाही माहिती असल्याचे पवार म्हणाले.

Web Title: Where did the Rs 20 lakh crore package go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.