नाशकात आपात्कालीन यंत्रणा आहेच कोठे?

By संजय पाठक | Published: April 15, 2021 04:55 PM2021-04-15T16:55:21+5:302021-04-15T16:58:22+5:30

नाशिक : शहरात कोरोनोची दुसरी लाट आल्यासारखी स्थिती असताना प्रत्यक्षात गेल्या वर्षी जी महापालिकेची यंत्रणा सक्रिय होती ती आता दिसत नाही. वैद्यकीय साहित्यापासून कर्मचाऱ्यांपर्यंतच्या मर्यादा ठीक, परंतु अनेक बाबतीत यंत्रणेचे नियंत्रण ढिले झाल्याचे दिसत आहे. त्याचेच परिणाम म्हणून महापालिकेने हेल्पलाइन सुरू केली असली तरी त्यातून बेड मिळत नाही की ऑक्सिजन ! अगदी मृतदेह नेण्यासाठीदेखील रुग्णवाहिका किंवा शववाहिका मिळत नाही अशी गंभीर अवस्था ओेढावली आहे.

Where is the emergency system in Nashik? | नाशकात आपात्कालीन यंत्रणा आहेच कोठे?

नाशकात आपात्कालीन यंत्रणा आहेच कोठे?

Next
ठळक मुद्देमहापालिकेची यंत्रणा अपुरी रुग्णालये मिळत नाही की ऑक्सिजन

नाशिक : शहरात कोरोनोची दुसरी लाट आल्यासारखी स्थिती असताना प्रत्यक्षात गेल्या वर्षी जी महापालिकेची यंत्रणा सक्रिय होती ती आता दिसत नाही. वैद्यकीय साहित्यापासून कर्मचाऱ्यांपर्यंतच्या मर्यादा ठीक, परंतु अनेक बाबतीत यंत्रणेचे नियंत्रण ढिले झाल्याचे दिसत आहे. त्याचेच परिणाम म्हणून महापालिकेने हेल्पलाइन सुरू केली असली तरी त्यातून बेड मिळत नाही की ऑक्सिजन ! अगदी मृतदेह नेण्यासाठीदेखील रुग्णवाहिका किंवा शववाहिका मिळत नाही अशी गंभीर अवस्था ओेढावली आहे.

नाशिकमध्ये गेल्या महिना भरात अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे. त्यामुळे पालक संस्था म्हणून महापालिकेकडून अपेक्षा आहेत. परंतु गेल्या वेळी अत्यंत संकट काळात ज्या सजगतेने यंत्रणा कार्यप्रवण होती तसे होताना दिसत नाही. नागरिकांसाठी खूप काही केल्याची हवा तयार करण्यात येते परंतु प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा कितपत लाभ होतो, याचे आयुक्त कैलास जाधव आणि महापौर सतीश कुलकर्णी यांनी ऑडिट करण्याची वेळी आली आहे.

महापालिकेने नागरिकांच्या मदत आणि माहितीसाठी २४ तास वॉर रूम तयार केल्या आहेत. मात्र, त्यावर ज्या रुग्णालयांचे संपर्क क्रमांक दिले जातात त्या रुग्णालयात सर्रास बेड शिल्लक नाहीत सांगितले जाते. त्यामुळे ही यंत्रणा उभारून नक्की काय उपयोग झाला तेच कळत नाही.

महापालिकेच्या रुग्णालयांमधील अपुऱ्या व्यवस्था हा वेगळा भाग असला तरी अगदी मृतदेह गुंडाळण्यासाठी कीट उपलब्ध नसल्याचा प्रकार नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात उघड झाला. इतकेच नव्हे तर पंचवटीत कोराेनाबाधित वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर शववाहिका अथवा रुग्णवाहिका सुद्धा मिळाली नाही. त्यामुळे मृत वृद्धेच्या मुलीला खासगी मोटारीतून मृतदेह नेण्याची वेळ आली. महापालिकेने गेल्या वर्षी आपात्कालीन परिस्थितीमुळे तब्बल ३० ते ३५ रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतल्या त्या गेल्या कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खासगी यंत्रणेतील नफेखोरी, अवास्तव आकारणी या सर्व बाबी समजण्यासारख्या आहेत. मात्र, त्या राेखण्याची यंत्रणा महापालिकेकडे असताना त्याचा प्रभावी उपयेाग होताना दिसत नाही. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांच्या हालअपेष्टा केव्हा थांबणार हा प्रश्न आहे.

Web Title: Where is the emergency system in Nashik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.