भुजबळांच्या नाशकात राष्टÑवादी उरली कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 11:17 PM2019-10-05T23:17:01+5:302019-10-05T23:18:48+5:30

नाशिक : शिवसेनेपासून ते राष्टÑवादीपर्यंतच्या प्रवासात नेहमीच ताकदवान नेता म्हणून पाहिले गेलेल्या छगन भुजबळ यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या नाशिक शहरात राष्टÑवादीला विधानसभा निवडणुकीत पक्षातूनच इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार मिळू नये इतकी कमजोर स्थिती पक्षाची झाली आहे काय, असा प्रश्न नाशिककरच स्वत:ला विचारू लागले आहेत.

Where the Nation 8 Plaintiffs Survived in the Destruction of Bhujbal? | भुजबळांच्या नाशकात राष्टÑवादी उरली कुठे ?

भुजबळांच्या नाशकात राष्टÑवादी उरली कुठे ?

Next
ठळक मुद्देदोलायमान स्थिती : तीनही मतदारसंघात आयारामांना दिली संधी

नाशिक : शिवसेनेपासून ते राष्टÑवादीपर्यंतच्या प्रवासात नेहमीच ताकदवान नेता म्हणून पाहिले गेलेल्या छगन भुजबळ यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या नाशिक शहरात राष्टÑवादीला विधानसभा निवडणुकीत पक्षातूनच इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार मिळू नये इतकी कमजोर स्थिती पक्षाची झाली आहे काय, असा प्रश्न नाशिककरच स्वत:ला विचारू लागले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात केवळ एकदाच प्रतिनिधित्व केलेल्या भुजबळ काका-पुतण्याला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे तर विधानसभा निवडणुकीत गेल्या दोन दशकात राष्टÑवादी नाशिक ग्रामीणमधून थोडेबहुत यश मिळवित असताना शहरात मात्र आपली मांड घट्ट बसवू शकलेली नाही. आताही विधानसभा निवडणुकीत शहरातील चार मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमध्ये आयारामांना पावन करून घेण्याची वेळ राष्टÑवादीवर ओढवली आहे.
१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्टÑवादीचे चार आमदार निवडून आले होते. नाशिक शहरात भाजपचे डॉ. दौलतराव अहेर विरुद्ध राष्टÑवादीचे डॉ. वसंत पवार असा सामना झाला; परंतु त्यात भाजपने बाजी मारली होती. २००४ च्या निवडणुकीत राष्टÑवादीच्या आमदारांची संख्या एकाने वाढली. निफाडमधून दिलीप बनकर, येवल्यातून छगन भुजबळ, चांदवडमधून उत्तम भालेराव, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ तर कळवणमधून ए. टी. पवार विजयी झाले होते. नाशिक शहरातील मतदारसंघातून कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव निवडून आल्या होत्या. २००९ मध्ये मात्र राष्टÑवादीला झटका बसत तीनच आमदार निवडून आले. त्यात नांदगाव, कळवण आणि येवल्याचा जागेचा समावेश होता. आघाडीमुळे नाशिक शहरातील नाशिक पूर्व आणि नाशिक मध्य कॉँग्रेसला तर नाशिक पश्चिम आणि देवळाली हे मतदारसंघ राष्टÑवादीला सोडण्यात आले होते; परंतु राष्टÑवादीचा दोन्ही ठिकाणी पराभव झाला. २०१४ मध्ये आघाडी दुभंगल्यामुळे राष्टÑवादीने स्वतंत्र उमेदवार दिले होते. त्यात राष्टÑवादीने नांदगाव, येवला, बागलाण आणि दिंडोरी या जागांवर विजय मिळविला. नाशिक शहरातील चारही जागांवर उमेदवार दिले; परंतु त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर टिकाव लागू शकला नाही.
गेल्या पाच वर्षांत छगन भुजबळ व पुतण्या समीर भुजबळ यांच्या तुरुंगवारीमुळे राष्टÑवादीची मोठी वाताहत झाली. मागील लोकसभा निवडणुकीत स्वत: छगन भुजबळ यांना तर चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांचा शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातून राष्टÑवादीकडून सेना-भाजपला कडवी लढत दिली जाण्याचे संकेत मिळत होते; परंतु इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवाराची चर्चाही कानावर पडत नव्हती. सेना-भाजपचे उमेदवार निश्चित होत असताना राष्टÑवादी चाचपडतानाच दिसून आली. विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक मध्य राष्टÑवादीने कॉँग्रेसला सोडला तर अन्य तीन मतदारसंघात आयारामांना संधी दिली आहे. त्यात नाशिक पूर्वमध्ये भाजपने तिकीट कापलेले आमदार बाळासाहेब सानप यांना तर देवळालीमधून भाजपच्या नगरसेवक सरोज अहिरे यांना राष्टÑवादीने उमेदवारी बहाल केली.
नाशिक पश्चिममध्ये वर्ष-दीड वर्षापूर्वीच भाजपतून राष्टÑवादीत आलेल्या अपूर्व हिरे यांच्या अर्जाला शेवटच्या क्षणी एबी फॉर्म जोडण्याची नामुष्की ओढवली. त्यापूर्वी, खुद्द भुजबळ यांनीच नाशिक पश्चिम मतदारसंघ माकपाला सोडण्याचे जाहीर केले होते; परंतु त्यांनाही ऐनवेळी यू टर्न घ्यावा लागला.

Web Title: Where the Nation 8 Plaintiffs Survived in the Destruction of Bhujbal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.