विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ‘कुठे हसू, कुठे रडू’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 08:26 PM2020-07-17T20:26:17+5:302020-07-18T00:45:07+5:30

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च २०२० मधील बारावी परीक्षेचा निकाल आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे. जिल्हाभरात विविध महाविद्यालयाच्या बारावी निकालात यंदा विद्यार्थिनींनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे.

'Where to smile, where to cry' on the faces of students! | विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ‘कुठे हसू, कुठे रडू’!

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ‘कुठे हसू, कुठे रडू’!

Next

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च २०२० मधील बारावी परीक्षेचा निकाल आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे. जिल्हाभरात विविध महाविद्यालयाच्या बारावी निकालात यंदा विद्यार्थिनींनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे. तर परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात येऊन पुढील परीक्षेस सामोरे जाण्याचे आवाहनही करण्यात आले. यामुळे काही ठिकाणी ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र पहावयास मिळाले. तर करिअर निवडीसाठी विविध क्षेत्रांमधील संधींचा शोध घेण्यात येत आहे. येवला येथील विद्या इंटरनॅशनल स्कूल व जुनिअर कॉलेजचा विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे. विद्यालयात आस्था वैभव पटेल (87.23) प्रथम, तनिशा नीलेश पटेल (85) द्वितीय, तर पूर्वा महेश भांडगे (76) तृतीय आली आहे.
येवला महाविद्यालय : येवला कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी कला शाखेचा निकाल 68.68 तर वाणज्यि शाखेचा निकाल 96.29 टक्के लागला आहे. शाखानिहाय पहिल्या तीन क्रमांकांमध्ये कला शाखेत अख्तर फुलखान पठाण (78.46), प्रतीक्षा निशिकांत भोरकडे (67.69), रोशनी अंबादास पवार (65.38), वाणिज्य शाखेतत आरती सुनील काळे (73.38), प्राजक्ता नवनाथ जाधव (71.07), तेजिस्वनी संजय मढवई (70.76) यांनी यश संपादन केले. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, दादासाहेब मामुडे आणि शिक्षकवर्गाने अभिनंदन केले आहे.
राजापूर विद्यालय : येवला तालुक्यातील राजापूर येथील क्र ां. वसंतराव नारायणराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावी परीक्षा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्क्के लागला असन कला शाखेचा निकाल 98.42 टक्के लागला आहे. शाखानिहाय पहिले तीन विद्यार्थी असे : विज्ञान शाखेतून ईश्वर अशोक विंचू (88), भावना काशीनाथ चव्हाण(81.23), शीतल चिंधा सानप (78.15), कला शाखेतून सीमा गुलाब चिवडगर(78 30), अर्चना श्रीधर वाघ (76.15), मुस्कान अल्ताफ शेख(76) यांनी यश मिळविले. प्राचार्य पी. के. आव्हाड, पर्यवेक्षक डी. एन. सानप, विभाग प्रमुख बी. एस. दराडे आदींनी अभिनंदन केले आहे.
संतोष विद्यालय, बाभूळगाव :
बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या संतोष श्रमिक माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजची विध्यार्थीनी हर्षिता देशमुख हिने सर्वाधिक 89.38 टक्के मिळवत तालुक्यात दुसर्या तर बाभूळगाव केंद्रात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 99 टक्के तर कला शाखा निकाल 75 टक्के लागला असून महाविद्यालयाचा एकित्रत निकाल 95 टक्के लागला आहे. शाखानिहाय पहिले तीन विद्यार्थींमध्ये विज्ञान शाखेतून हर्षिता देशमुख, श्रुती आहेर (83.69), सिद्धांत भड (81.84), कला शाखेत अश्विनी मोरे (76.30), अश्विनी कांबळे (77.7 ), प्रमिला ठोंबरे (70.92) यांनी यश संपादन केले.
संतोष विद्यालय, रहाडी : जगदंबा एज्युकेशन सोसायटीच्या रहाडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल 96.79 तर कला शाखेचा निकाल 99 टक्के लागला आहे. विद्यालयात विज्ञान शाखेत नागरे ऋषीकेश रंगनाथ (84.61) प्रथम तर कला शाखेत दिवे गायत्री उमेश (69.33) प्रथम आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालकांसह प्राचार्य पैठणकर व शिक्षकवर्गाने अभिनंदन केले आहे.
विवेकानंद विद्यालय, एरंडगाव : एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 81.57 टक्के लागला आहे. विद्यालयात शेख मुस्कान अन्सार (82.92) प्रथम, उराडे योगिता श्रावण (77.23) द्वितीय तर गोसावी कल्याणी शिवाजी (76.46) तृतीय आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालकांसह विद्यालयाचे प्राचार्य अंबादास सालमुठे आणि शिक्षकवर्गाने अभिनंदन केले आहे.
जनता विद्यालय, जळगाव नेऊर : जळगाव नेऊर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय बारावी सायन्स शाखेचा निकाल 92.15 टक्के तर कला शाखेचा निकाल 75 टक्के लागला आहे. शाखानिहाय पहिले तिन विद्यार्थी असे : विज्ञान शाखेत वैभव संपत शिंदे (75.69), अक्षय नामदेव आथरे (73.53), सरला भास्कर शिंदे (73.07), कला शाखेत अर्चना राजेंद्र दरगुडे (68.46), कोमल रामभाऊ तांबे (64), चेतन मच्छिंद्र शिंदे (61.69). यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य एन. ए. दाभाडे आव शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: 'Where to smile, where to cry' on the faces of students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक