स्वच्छ भारत अभियानात कोणती महापालिका मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 07:17 AM2021-02-03T07:17:39+5:302021-02-03T07:18:09+5:30

Swachh Bharat Abhiyan : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

Which Municipal Corporation will win in Swachh Bharat Abhiyan? | स्वच्छ भारत अभियानात कोणती महापालिका मारणार बाजी?

स्वच्छ भारत अभियानात कोणती महापालिका मारणार बाजी?

googlenewsNext

- संजय पाठक
नाशिक - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. कोरोनामुळे यंदा मार्च महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी मागील काळातील उणिवा दूर करण्यासाठी सर्वच महापालिकांमध्ये धावपळ सुरू आहे. नाशिक महापालिकेनेही झीरो गारबेजसाठी अगदी खडी, ढबरचे रस्ते तयार करण्यापासून अस्वच्छता करणाऱ्यांना दंडाबरोबरच समाजसेवा करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे बऱ्याच अंशी शहर स्वच्छतेस मदत झाली आहे.

नाशिक महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन अत्यंत उत्तम असले तरी केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात अपेक्षित यश महापालिकेला मिळाले नाही. सुरुवातीला देशातील ६७ आणि ६४ असे क्रमांक मिळविले. अर्थात, केंद्र शासनाचे नियम आणि निकष सातत्यने बदलत असल्याने त्या- त्या वर्षी या नियमांची पूर्तता करणे आव्हानात्मक ठरत आहे. गेल्या वर्षीपासून तीन महिन्यांनी सर्वेक्षण आणि स्वयंमूल्यांकन अशी पद्धती करण्यात आली आहे. त्यावेळी नाशिक महापालिकेला वर्षाअखेरीस धुळे महापालिकेपेक्षा कमी म्हणजे, सिंगल स्टार मानांकन मिळाले. तर अंतिम सर्वेक्षणात मुसंडी मारून देशात अकरावा क्रमांक मिळविला. आता टॉप फाईव्हसाठी महापालिकेने तयारी केली आहे.  

स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी धुळे महापालिकेने सक्रीय सहभाग नोंदवित अभिनव प्रयोग करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. वर्दळीच्या ठिकाणी कचराकुंडी ठेवणे आणि कचरा संकलनासाठी सुमारे १०० घंटागाड्यांचे नियोजन केले आहे. नाशिक विभागीय पातळीवरुन महापालिका स्तरावर स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे. नगरसेवकांशी समन्वय साधून चौक निश्चित करणे आणि सर्व भागात घंटागाडी पोहोचेल, याकडे बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. 

जळगाव महापालिका देशात ६४ व्या स्थानावर तर राज्यातील ३३ महापालिकांमध्ये २० व्या स्थानावर आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांच्या रेटिंग स्पर्धेतही जळगावला ३ स्टार दिले आहेत. 
नाशिक, अहमदनगरसारख्या मोठ्या शहरांना केवळ एकच स्टार मिळाला आहे. महापालिकेकडून अजूनही कचऱ्यावर पूर्णपणे प्रक्रिया केली जात नसून, घनकचरा प्रकल्प आठ वर्षांपासून बंद आहे. 
स्टार रेटिंग व स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत ६०० गुणांचे नुकसान झाले. घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ओला व सुक्या कचऱ्याचे संकलन नियमित होते. 

 नागरिकांच्या कल्पकतेला वाव
नाशिक महापालिकेच्या वतीने स्वच्छतेसाठी प्रयेागशीलतेला वाव देण्यात येत असून घरगुती ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याबरोबरच अन्य वेगळे प्रकल्प राबविणाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. 
 लॉकडाऊन केल्यानंतर नाशिकमार्गे जाणाऱ्या प्ररप्रांतीयांनी टाकलेल्या प्लास्टिक पिशव्या घेऊन पोलिसांच्या बॅरिकेटवर शोभिवंत झाडे लावणारा पेालीस कर्मचारी सचिन जाधव आणि घरगुती कचऱ्यापासून स्वयंपाकासाठी बायोगॅस तयार करणाऱ्या प्रकल्पांची महापालिकेने निवड केली आहे. 

अहमदनगर : घातक कचऱ्याचे स्वतंत्र संकलन
अहमदनगर महापालिकेने घरातील घातक कचऱ्याचे संकलन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून, घंटागाडीत स्वतंत्र पेटीची व्यवस्था केली आहे. बांधकाम साहित्याचा पुर्नवापर करण्यात येत आहे. मागील वर्षी स्वच्छतेत अहदमनगर शहराने देशात ४० वा क्रमांक पटकविला. त्यामुळे महापालिकेला मानाचे ‘थ्री स्टार’ मानांकन मिळाले. यंदा महापालिकेने ‘५-स्टार’साठी नोंदणी केली आहे.

Web Title: Which Municipal Corporation will win in Swachh Bharat Abhiyan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.