अमृताचा लाभ घेताना ‘चपलांचा अहेर’त्

By admin | Published: September 26, 2015 10:46 PM2015-09-26T22:46:52+5:302015-09-26T22:47:57+5:30

अमृताचा लाभ घेताना ‘चपलांचा अहेर’त्

While availing Amrita's benefits, | अमृताचा लाभ घेताना ‘चपलांचा अहेर’त्

अमृताचा लाभ घेताना ‘चपलांचा अहेर’त्

Next

र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्यातील तिसरी पर्वणी अपूर्व उत्साहात पार पडल्यानंतर मुहूर्तावर कुशावर्तात स्नान करण्यासाठी जवळपास लाखाच्या वर भाविकांनी त्र्यंबकनगरी गजबजली होती. कुशावर्ताच्या दिशेने चारही बाजूंनी भाविकांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. कुशावर्तात येण्याचा आणि स्नान केल्यावर बाहेर पडण्याचा मार्ग भिन्न असल्यामुळे आणि कुशावर्त कुंडात चपला वापरण्यास मनाई असल्याने भाविकांच्या चपलांचा खच जागोजागी दिसत होता. सफाई कर्मचाऱ्यांनी या चपला ट्रॅक्टरमध्ये जमा करून कचरा डेपोकडे त्या पाठविल्या.
शुक्रवारी ४८ तासांत पाच ट्रॅक्टर चप्पल केवळ कुशावर्त परिसरात जमा झाल्याचे समजते. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातही तीच गत होती. मंदिरात प्रवेश करण्याचा मार्ग व बाहेर पडून बसस्थानकाकडे जाण्याचा मार्ग भिन्न असल्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात चपलांचा खच निर्माण झाला. चपलांबरोबरच कुशावर्त परिसरात भाविकांनी स्नान झाल्यानंतर ओले कपडेही तेथेच सोडून देण्यावर भर दिल्याने कपड्यांचाही ढीग पहायला मिळतो आहे. सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असले तरी गर्दीने भरलेले त्र्यंबकेश्वर पाहता हा कचरा वाहून कसा न्यायचा, कुठपर्यंत न्यायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. गर्दीमुळे आणि जागोजागी उभ्या असलेल्या बॅरिकेडिंगमुळे घंटागाड्यांची गावातून ने-आण करणेही अवघड झाले आहे. गर्दीचा ओघ कमी झाल्यानंतरच गावातील स्वच्छता व्यवस्थितपणे करणे शक्य होणार आहे. तासनतास रांगेत प्रतीक्षा करणाऱ्या स्नानाच्या आणि मंदिर दर्शनाच्या भाविकांना त्र्यंबकनगरीत जागोजागी अल्पोपहार, चहा, कॉफी, दूध यांचेही वाटप करण्यात आले. त्यामुळे कागदी डीश, मिनरल वॉटरच्या बाटल्या, कागदी कप, प्लॅस्टिकचे कप यांचाही कचरा जागोजागी दिसून येत आहे. लाखो भाविकांनी कुशावर्तात स्नान केल्यानंतर आता त्यातील पाण्यालाही दुर्गंधी येत असून, भाविकांची संख्या मर्यादित झाल्यानंतर तीर्थातील सर्व पाणी उपसून टाकणे आणि गावात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

Web Title: While availing Amrita's benefits,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.