संसाराचा गाडा सुरळीत होत असतानाच मोलकरणींना पुन्हा झाले घरांचे दरवाजे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:13 AM2021-04-13T04:13:59+5:302021-04-13T04:13:59+5:30

चौकट - दिवसभरात किमान पाच घरांची कामे घरकाम करणाऱ्या महिलांच्या कामाचे दर मोहल्ल्यानुसार बदलणारे असले तरी धुणी, भांडी ...

While the car of the world was getting smoother, the doors of the houses were closed to the maids again | संसाराचा गाडा सुरळीत होत असतानाच मोलकरणींना पुन्हा झाले घरांचे दरवाजे बंद

संसाराचा गाडा सुरळीत होत असतानाच मोलकरणींना पुन्हा झाले घरांचे दरवाजे बंद

Next

चौकट -

दिवसभरात किमान पाच घरांची कामे

घरकाम करणाऱ्या महिलांच्या कामाचे दर मोहल्ल्यानुसार बदलणारे असले तरी धुणी, भांडी आणि लादी पुसणे या प्रत्येक कामासाठी साधारणत ६०० ते ८०० रुपये प्रत्येक कामाचे मिळतात. एक महिला दिवसभरात किमान पाच ते सात घरांचे काम करते, यामुळे एका घरातून तीनही कामांचे महिन्याला १८०० ते २४०० रुपये मिळतात, तर पाच घरांमधून महिन्याकाठी ९ ते दहा हजार रुपयांची कमाई होते. या कमाईवरच संबंधित महिलेच्या कुटुंबाचा प्रपंच चालतो. विशेष म्हणजे अनेक महिला घरखर्च भागवून बचतही करत असतात.

कोट-

कोरोनाचे संकट आल्यापासून माझे काम बंद झाले आहे. यामुळे गावाला जाऊन मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. मागील वर्षी लॉकडाऊन संपल्यानंतर कामाला सुरुवात केली, पण घरमालक पूर्वीप्रमाणे पैसे देेण्यास तयार नाहीत, यामुळे आता रोजंदारीचा पर्याय शोधला आहे.

- मंगला पवार

कोट -

संसाराचा गाडा रुळावर येत असतानाच पुन्हा कोरोना संकटाने तोंड वर काढले आहे. यामुळे माझे तीन घरांमधील काम सुटले आहे. आता घरखर्च भागवायचा कसा, असा प्रश्न पडला आहे. दुसरे काम मिळाले तर लोक पैसे कमी देतात यामुळे ते काम परवडत नाही. आता मिळेल ती मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय नाही

- रजनी बिऱ्हाडे

कोट-

कोरोना संकटाच्या काळात दोन मुलींची लग्ने केली. मुलाचा संसार मार्गी लावला हे सर्व धुणी, भांडीच्या कामावरच केले. मिळेल त्या पगारात काम स्वीकारले, पण आता पुन्हा संकट उभे राहिले आहे. आता संसाराचा गाडा हाकायचा कसा याचाच विचार डाेक्यात सतत घोळत राहतो.

- कमल हाटे

चाैकट -

शहरात घरकाम करणाऱ्या महिलांची संख्या २५०००

काम सुटलेल्या महिलांची संख्या १२००० ते १५०००

Web Title: While the car of the world was getting smoother, the doors of the houses were closed to the maids again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.