स्वच्छ सर्वेक्षण सुरू असताना नाशिकच्या महापौरांना मात्र शहरात अस्वच्छतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 07:04 PM2018-01-05T19:04:34+5:302018-01-05T19:06:20+5:30

स्वच्छ सर्वेक्षण : महापौरांसह पदाधिका-यांकडून ठिकठिकाणी पाहणी दौरा

 While the clean survey was going on, Nashik Mayors also saw a dirty look in the city | स्वच्छ सर्वेक्षण सुरू असताना नाशिकच्या महापौरांना मात्र शहरात अस्वच्छतेचे दर्शन

स्वच्छ सर्वेक्षण सुरू असताना नाशिकच्या महापौरांना मात्र शहरात अस्वच्छतेचे दर्शन

Next
ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा प्रशासनाचा दावा फोल स्वच्छ सर्वेक्षणात मागील वर्षी नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नाशिक महापालिकेचे कान उपटले होते

नाशिक - केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाला एकीकडे ४ जानेवारीपासून सुरूवात झालेली असताना महापौरांसह पदाधिका-यांना पाहणी दौ-यात ठिकठिकाणी अस्वच्छतेसह अव्यवस्थेचे दर्शन घडत आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरत असून गेल्या चार-सहा महिन्यांपासून होत असलेल्या तयारीवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात मागील वर्षी नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नाशिक महापालिकेचे कान उपटले होते. यावर्षी नाशिकची कामगिरी उंचावण्याचेही त्यांनी आदेशित केलेले आहे. त्यानुसार, महापालिका प्रशासनाकडून विविध गुणांकनासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनाही केल्या जात असल्याचा दावा केला जात आहे. स्वच्छ सर्वेक्षणाला प्रत्यक्ष गुरुवार (दि.४) पासून सुरुवात झाली असून केंद्रीय समितीचे पथक शहरातील स्वच्छतेच्या कामकाजाची कधीही-केव्हाही पाहणी करण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन पथकाच्या प्रतीक्षेत असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून महापौरांसह पदाधिकाºयांनी शहरात ठिकठिकाणी पाहणी दौरे सुरू केले आहेत. मात्र, या दौºयात महापौरांसह पदाधिका-यांना प्रशासनाच्या कामकाजाचा फोलपणा निदर्शनास येत आहे. ठिकठिकाणी अस्वच्छतेसह अव्यवस्थेचे दर्शन घडत आहे. शुक्रवारी (दि.५) महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, आरोग्य समिती सभापती सतीश कुलकर्णी, शहर अभियंता उत्तम पवार, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांचेसह नगरसेवक गजानन शेलार, हिमगौरी अहेर, स्वाती भामरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी उद्यान, डॉ. आंबेडकर उद्यान, मेळा बस स्थानक, सेंट्रल बस स्थानक, महात्मा गांधी रोड, शिवाजीरोड, शरणपूर रोड, फुले मार्केट, फाळके रोड येथे पाहणी केली. परिसरातील आरोग्य विषयक समस्या,रस्ते, वीज,गटार,बांधकाम आदी विषयाच्या समस्या जाणून घेऊन संबधित विभागाचे अधिका-यांना कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे आदेशित केले. ब-याच ठिकाणी कचरा उचललेला नसल्याचे आढळून आले. शिवाजी उद्यानातील भयावहकता पाहून सारेच हैराण झाले. काही ठिकाणी उघड्या गटारी कच-याने तुंबलेल्या दिसून आल्या. या अव्यवस्थेमुळे पदाधिका-यांनी संताप व्यक्त करत त्या-त्या खातेप्रमुखांना जाब विचारत धारेवर धरले.
आताच कसे सुचले?
स्वच्छ सर्वेक्षणाचा पेपर सुरू झाला असताना महापौरांसह पदाधिका-यांच्या पाहणी दौºयात स्वच्छतेच्या कामाचे वाभाडे निघत आहेत. स्वच्छ सर्वेक्षणासाठीची तयारी गेल्या चार-सहा महिन्यांपासून सुरू असताना त्याचवेळी महापौरांसह पदाधिका-यांनी स्वच्छतेच्या कामांबाबत असलेला कळवळा दाखविला असता तर कदाचित आजच्या घडीला अव्यवस्थेचे दर्शन घडले नसते. आता वधूसंशोधनासाठी वराकडील मंडळी येऊ घातली असताना आपल्याच मुलीविषयीचे दोष त्यांच्यासमोर उघडे करून मुलीला नाकारण्यास भाग पाडण्याचा हा प्रकार चर्चेचा आणि मनोरंजनपर ठरत आहे.

Web Title:  While the clean survey was going on, Nashik Mayors also saw a dirty look in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.