एकलहऱ्यात बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 02:01 AM2019-02-06T02:01:29+5:302019-02-06T02:01:59+5:30
एकलहरे-हिंगणवेढा वाळूवाट शिवारातील मळ्यात बिबट्याने हल्ला चढवून शेतकºयाच्या ८ ते ९ कोंबड्या फस्त केल्याने परिसरातील शेतकºयांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.
एकलहरे : येथील एकलहरे-हिंगणवेढा वाळूवाट शिवारातील मळ्यात बिबट्याने हल्ला चढवून शेतकºयाच्या ८ ते ९ कोंबड्या फस्त केल्याने परिसरातील शेतकºयांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.
एकलहरे-हिंगणवेढा परिसरात बिबट्याचा वावर असल्याने व त्याने अनेक कुत्रे, बकरे फस्त केल्याने या भागात बिबट्याला बंदिस्त करण्यासाठी पिंजराही लावण्यात आला होता. मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही बिबट्या पिंजºयात बंदिस्त न होता वनविभागाला हुलकावणी देत आहे. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाºयांनी या भागात लावलेला पिंजरा अखेर तेथून हलविला. बिबट्याने पिंजºयाकडे पाठ फिरविली असली तरी, तो परिसरातील नागरिकांना दिवसा दर्शन देत असल्याची नागरिकांच्या तक्रारी आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड असल्याने बिबट्या तेथे लपत असावा असा अंदाज होता, परंतु आता परिसरातील बहुतेक भागात ऊसतोड झाल्याने बिबट्या एकलहरेकडे स्थलांतरित झाला असावा, असा अंदाज आहे.
रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास एकलहरे शिवारातील वाळूवाट रस्त्यावरील योगेश नावाडकर यांच्या शेतातील घराबाहेर कोंबड्यांंच्या जाळीवर बिबट्याने हल्ला चढवून ८ ते ९ कोंबड्यांचा फडशा पाडला. कोंबड्यांच्या कलकलाटाने योगेश व त्याचे भाऊ राजाराम यांनी बाहेर येऊन पाहिले असता बिबट्याने घातलेला धुमाकूळ पाहून घरातून बॅटरी व काठ्य घेऊन बाहेर आले. एकाने गाडी चालू करून उजेड व हॉर्नचा कर्कश आवाज केला व बिबट्याला पळवून लावले.
मंगळवारी सकाळी गावातील संदीप पवळे व नावाडकर यांनी वन अधिकारी रवि भोगे यांच्याशी संपर्क साधून रात्रीच्या घटनेबाबत माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाºयांनी येऊन शेताची व बिबट्याच्या ठशांची पाहणी केली. या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शांताराम राजोळे, अशोक पवळे, ज्ञानेश्वर पवळे, बबन राजोळे, राजाराम भवर, राजू जाधव आदी शेतकºयांनी केली आहे.