कुजबुज शहरातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:57+5:302021-07-10T04:11:57+5:30
नाशिक : शहरात अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्या किंवा रस्त्यांच्या शेजारी नो पार्किंगमध्ये वाहने लावून जाणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी या आठवड्यातच वाहने ...
नाशिक : शहरात अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्या किंवा रस्त्यांच्या शेजारी नो पार्किंगमध्ये वाहने लावून जाणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी या आठवड्यातच वाहने टोईंग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र अद्यापही अनेक नागरिकांना त्याची माहितीच नसल्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे वाहने नो पार्किंग परिसरात लावून मोकाट फिरणाऱ्यांची संख्यादेखील भरपूर आहे. शुक्रवारीदेखील शहराच्या मध्यवस्तीतील एम.जी. रोड परिसरात एका नागरिकाने त्याची गाडी रस्त्यालगतच पार्किंग करून तो कामासाठी निघून गेला; मात्र काम उरकून परतताच जागेवर गाडी नसल्याचे दिसताच त्याने एकदम डोक्याला हात लावला. मग रस्त्यावर खडूने लिहिलेले दिसल्यावर सहज त्याच्यासमवेत असलेल्या सहकाऱ्याशी बोलला ‘आजचा दिवसच वाईट आहे, काम पण नाही झालं. हा फुकटचा दंड पण बसणार. अमावास्या भोवली.’ त्यावर त्याचा सहकारी त्याला म्हणाला अमावास्या नाही, तुझी घाई भोवली.
धनंजय रिसोडकर