कुजबुजसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:11 AM2021-07-23T04:11:16+5:302021-07-23T04:11:16+5:30
नुकत्याच झालेल्या एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना विविध पदे जाहीर करून त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येत होते. कार्यकर्ते नेहमीच्या ...
नुकत्याच झालेल्या एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना विविध पदे जाहीर करून त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येत होते. कार्यकर्ते नेहमीच्या स्टाइलमध्ये भाऊ, तुम आगे बढोच्या घोषणा देत होते. त्यानंतर पदवाटपाचा कार्यक्रम पार पडला. प्रत्यक्ष भाऊंच्या भाषणाची वेळ आली. कार्यकर्त्यांनी पदे केवळ मिरवण्यापुरती वापरू नयेत. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन केले. भाऊंचे आवाहन सुरू असतानाच मागच्या रांगेतील कार्यकर्ता पुटपुटला, पण इथे रस्त्यावर तर उतरू दिलं पाहिजे ना, पोलीस लगेच दांडे हाणतात दांडे. असे त्या कार्यकर्त्याने म्हणता क्षणी त्या गर्दीतही हास्यस्फोट झाला.
----------------------------
इधरपे कुछ फली डालने का ना ...
आधीच रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यात शहरातील मध्यवर्ती भागात खोदून ठेवलेल्या रस्त्यांतून वाट काढत नागरिक कसेबसे जी वस्तू घ्यायची असेल त्या दुकानांपर्यंत पोहोचतात. दुकानांमध्येदेखील फारसे ग्राहक नसल्याने दुकानदारदेखील ग्राहकांची वाटच पाहत बसलेले असतात. त्यामुळे जे कुणी ग्राहक येतील, त्यांना भरपूर वेळ आणि चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका कपड्यांच्या दुकानात एक महिला कपडे खरेदीसाठी गेल्या. बराच वेळ आणि शेकडो प्रकार उलटून बघितल्यानंतर संबंधित महिलेने एक रेडिमेड पंजाबी ड्रेस घेतला. त्यानंतर घासाघीस करून बिल भरून झाल्यानंतर महिला दुकानाबाहेर पडत असताना दुकानदार म्हणाला दीदी थोडा संभालके हा...असे तो म्हणत असतानाच दीदींचा पाय नेमका दुकानाबाहेरील खड्ड्यात पडला आणि त्या मटकन खाली बसल्या. कपड्यांना चिखल लागताच त्या दुकानदारालाच म्हटल्या कसलं संभालके, इधरपे कुछ फली डालनेका ना !
-------------
हा मजकूर पान २ च्या मजकूरसाठी आहे.