पांढऱ्या सोन्याला ‘लाल्या’चा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 10:29 PM2019-12-03T22:29:06+5:302019-12-03T22:30:20+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरात शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून संबोधल्या जाणाºया कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला असताना यंदा लाल्या रोगाने कपाशीवर आक्रमण केल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कपाशीच्या झाडांची पाने लाल होऊन वाळत आहेत. फक्त वाळलेली झाडे शेतात दिसतात. तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकºयांचे भवितव्य हे पांढºया सोन्यावर अवलंबून असते. पण राजापूरकरांच्या नशिबी कायम दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो. यंदा मात्र, चांगला पाऊस झाला; मात्र लाल्या व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरीवर्गाची निराशा झाली आहे. कपाशी हिरव्यागार राहिलेल्या तर आज त्यांना पाणी भरपूर व औषधे फवारणी करून उत्पन्न वाढू शकले असते. पण परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. राजापूर गावाला कितीही जास्त प्रमाणात पाऊस झाला तरी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात विहिरींना पाणी पुरेल की नाही, असे प्रश्न निर्माण होतो. कापसाच्या उत्पादनातून दोन पैसे मिळतील, असे आशावादी राहून शेतकरी पांढºया सोन्यावर भर
देतात.
पण लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.पांढºया सोन्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाने तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी.
- राजेंद्र वाघ, शेतकरी