व्हाइटनर नशेतून गुन्हेगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:02 AM2017-12-27T00:02:32+5:302017-12-27T00:23:16+5:30

‘व्हाइटनर गॅँग’मधील अल्पवयीन मुलांना या नशेतून आणि त्यांच्याकडून होत असलेल्या गुन्हेगारीतून कसे बाहेर काढावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडाळागाव आणि राजीवनगर झोपडपट्टीतील व्हाइटनर गँगच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

Whitener Crime Pregnancy | व्हाइटनर नशेतून गुन्हेगारी

व्हाइटनर नशेतून गुन्हेगारी

Next

संजय शहाणे।
इंदिरानगर : ‘व्हाइटनर गॅँग’मधील अल्पवयीन मुलांना या नशेतून आणि त्यांच्याकडून होत असलेल्या गुन्हेगारीतून कसे बाहेर काढावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडाळागाव आणि राजीवनगर झोपडपट्टीतील व्हाइटनर गँगच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.  वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, पिंगुळी बाग, अण्णा भाऊ साठेनगर, मेहबूबनगर यांसह परिसरात आणि राजीवनगर झोपडपट्टी परिसरात व्हाइटनर गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. दोन्ही ठिकाणी झोपडपट्टी परिसर असल्याने उदरनिर्वाहासाठी हातावर काम करण्याची लोकवस्ती म्हणून ओळखली जाते. आई-वडील सकाळी मोलमजुरीसाठी घराबाहेर निघून गेल्यानंतर लहान मुले घरात एकटीच असतात. याचाच फायदा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी घेऊन मुलांना व्हाइटनरसारख्या नशेच्या सवयी लावल्या आहेत. या मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केल्याचे निदर्शनास आले आहे  या झोपडपट्ट्यांतील अल्पवयीन मुलांना व्हाइटनरची नशा केल्यानंतर कोणत्याही प्रकारची शुद्ध नसते. त्यामुळे त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जे सांगतात ते करण्यास ते राजी होत आहेत. त्यामुळे परिसरात भुरट्या चोºया आणि घरफोडीच्या घटना नियमित घडत आहेत. ही मुले रस्त्याने ये-जा करताना लहान मुली, युवती व महिलांची छेडछाड करत आहेत. त्यामुळे परिसरात व्हाइटनर गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.   व्हाइटनर नशा करणाºया अल्पवयीन मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. व्हाइटनर गँगच्या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व्हाइटनर कोठून आणून देतात हासुद्धा प्रश्न आहे. कारण स्टेशनरी दुकानांमधून व्हाइटनर सहजासहजी विक्री केले जात नाही. त्यामुळे ही मुले ते कुठून मिळवतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  अल्पवयीन मुले असल्याने पोलिसांना फार कडक भूमिका घेता येत नाही. व्यसन करून गुन्हा केलेल्यास रंगेहाथ पकडल्यावर पोलिसांना त्यांचा ताबा रिमांड होमकडे द्यावा लागतो. त्या ठिकाणी सदर मुलांचे पालक बॉण्ड लिहून त्यांना सोडवून घेतात. सदर मुले परिसरात पुन्हा गुन्हेगारी कृत्य करण्यास मोकळे होतात.

Web Title: Whitener Crime Pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.