अल्पवयीनांभोवती व्हाइटनर नशेचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:29 AM2019-11-24T00:29:06+5:302019-11-24T00:29:36+5:30
परिसरात अल्पवयीन मुलांभोवती व्हाइटनरच्या नशेचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, अशी नशा करणाऱ्यांची व्हाइटनर गॅँग तयार झाल्यामुळे परिसरातील गुन्हेगारीतही वाढ होत आहे.
इंदिरानगर : परिसरात अल्पवयीन मुलांभोवती व्हाइटनरच्या नशेचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, अशी नशा करणाऱ्यांची व्हाइटनर गॅँग तयार झाल्यामुळे परिसरातील गुन्हेगारीतही वाढ होत आहे. परिसरातील काही विकृत प्रवृत्तींकडून कामगार वस्त्यांमध्ये दिवसा एकट्या राहणाºया अल्पवयीन मुलांना लक्ष करून या नशेच्या विळख्यात अडकवून हे नशेचे रॅकेट चालविलेचा असून, यातून मुलांना बाहेर कसे काढावे? असा प्रश्न पालकांसह पोलिसांसमोरही निर्माण झाला आहे.
वडाळागाव, भारतनगर, राजीवनगर झोपट्टीतील व्हाइटनर गँगच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वडाळागावातील, घरकुल योजना पिंगुळी बाग, अण्णा भाऊ साठेनगर, मेहबूबनगर, गुलशननगर, भारतनगर, मुमताजनगर, राजीवनगर झोपडपट्टी परिसरात व्हाइटनरची नशा करणाºया अल्पवयीन मुलांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या भागातील वसाहत उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी आणि मिळेत ते काम करणाऱ्यांची लोकवस्ती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे घरातील आई-वडील सकाळी मोलमजुरीसाठी घराबाहेर निघून गेल्यानंतर लहान मुलेच घरात असतात याचाच फायदा काही गुन्हेगारी प्रवृतीच्या विकृत गुन्हेगारांनी घेऊन त्यांना व्हाइटनर नशेच्या जाळ्यात ओढण्यासोबतच नशेच्या विळख्यात सापडलेल्या अशा अल्पवयीन मुलांकडून त्यांचा गुन्हेगारीसाठी वापर होत आहे.
गुन्हेगारीत वाढ
व्हाइटनरची नशा केल्यानंतर विचारक्षमता संपुष्टात येत असल्याने त्यांना गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केले जाते. त्यामुळे परिसरात भुरट्या चोºया आणि घरफोडीच्या घटना नियमित घडत असतात. या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलिसांकडून व्हाइटनर गँगच्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात पाठवले जाते. परंतु काही दिवसांतच ही मुले बाहेर येताच त्यांना या जाळ्यात ओढण्यासाठी व्हाइटनर नशेचे रॅकेट चालविण्यासाठी सक्रिय होतात.
कारवाईला अडचण
व्हाइटनरच्या नशेत अडकलेली बहुतांश मुले हे अल्पवयीन असल्याने पोलिसांना कारवाई करण्यास अडचण निर्माण होते. या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना रिमांडहोममध्ये पाठविण्यात येते. त्या ठिकाणी त्यांचे पालक प्रतिज्ञापत्र लिहून त्यांना सोडवून घेतात. परंतु, पुन्हा ही मुले व्हाइटनरसह वेगवेगळ्या नशेच्या विळख्यात अडकून गुन्हेगारी कृत्यांकडे वळत असल्याने परिसरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे.
खुनाच्या गुन्ह्यातही सहभागाची शक्यता
पेठेनगर परिसरात दहा दिवसांपूर्वी मोकळ्या मैदानातील विहिरीत एका अल्पवयीन मुलास तीन अल्पवयीन मुलांनी नायलॉन दोरीने गळा आवळून फेकून दिल्याची घटना घडली होती. ते तिघेही संशयित व्हाइटनर
नशेच्या आहारी गेल्याचे समजते. त्यामुळे परिसरात व्हाइटनर गँगची दहशत दिवसें दिवस वाढतच चालली असून, त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची तसेच कारवाईची मागणी इंदिरानगर,पेठेनगर आदी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.