अटीतटीच्या लढतीत वर्चस्व कोणाचे?
By admin | Published: November 18, 2016 10:39 PM2016-11-18T22:39:17+5:302016-11-18T22:40:18+5:30
अटीतटीच्या लढतीत वर्चस्व कोणाचे?
भगूर : येथील प्रभाग ५ ब हा जनरल असून, येथे तिरंगी लढत होणार आहे. कोण कोणत्या समाजाची मते आपल्याकडे जास्त खेचतो यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
येथून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे मोहन करंजकर, शिवसेनेकडून संतोष ओहोळ आणि भाजपाच्या वतीने युनुस शेख आपले नशीब आजमावत आहेत. यातील मोहन भिकाजी करंजकर हे पदवीधर असून, विद्यमान भगूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष असून, मुरब्बी राजकारणी आणि समाजसेवक आहेत. ते श्रीदत्त मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून, त्यांनी महिला-पुरुषांच्या आरोग्याविषयी अनेक शिबिरे घेऊन अनेकांना मदत केली आहे. मागील निवडणुकीत थोड्याच मताने निसटता पराभव झाला होता. त्यांची मराठा, दलित, आदिवासी मतदारांवर जास्त पकड असून, त्यांचे चुलते भगूरचे जनतेतून प्रथम नगराध्यक्ष निवडून आलेले पां. भा. करंजकर यांचे येथे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय वारसाने मोहन करंजकर उभे असून, प्रचारात आघाडीवर आहेत.
संतोष ओहोळ हे शिवसेनेचे कार्यकर्ते असून, धनगर समाजात त्यांना मानणारा वर्ग आहे. त्यांच्या नात्यागोत्यात मोठ्या प्रमाणावर मतदार वर्ग आहे. सर्व जातिधर्मात त्यांचे उठणे बसणे असून, ते पण शिक्षित आहेत. तसा त्यांना राजकीय वारसा नसला तरी या प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व आहे आणि मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते सामाजिक काम करतात. येथे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना विशेष मानणारा वर्ग असल्याने उमेदवार जरी राजकारणी नाही तरी पण शिवसेनेच्या प्रयत्नामुळे येथून संतोष ओहोळ यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. (वार्ताहर)