सटाण्यातील मिरवणुकीला परवानगी नेमकी कोणाची? - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:18 AM2021-08-25T04:18:25+5:302021-08-25T04:18:25+5:30

सटाणा : शाहीर अण्णा भाऊ साठे व वीर एकलव्य यांच्या जयंती उत्सवास परवानगी नाकारणारे पोलीसच आपल्या वरिष्ठाच्या ...

Who exactly allowed the procession in Satana? - A | सटाण्यातील मिरवणुकीला परवानगी नेमकी कोणाची? - A

सटाण्यातील मिरवणुकीला परवानगी नेमकी कोणाची? - A

Next

सटाणा : शाहीर अण्णा भाऊ साठे व वीर एकलव्य यांच्या जयंती उत्सवास परवानगी नाकारणारे पोलीसच आपल्या वरिष्ठाच्या निरोप समारंभानिमित्त गावातून सवाद्य मिरवणूक काढतात. सामान्यांसाठी नियमांची आडकाठी आणणाऱ्या पोलीस निरीक्षकाच्या मिरवणुकीसाठी परवानगी नेमकी कोणाची होती.. पोलीस अधीक्षकांची की गृहमंत्र्यांची असा सवाल शहर व तालुकावासीयांच्या मनात उपस्थित होत आहे.

दोन वर्षांपूर्वी सटाणा पोलीस ठाण्यातील निरीक्षकपदाची सूत्रे नंदकुमार गायकवाड यांनी स्वीकारली होती. दोन वर्षाच्या काळात त्यांनी केलेला नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न, कोविडची परिस्थिती हाताळण्यासाठी दिलेले योगदान व शासकीय निधी नसताना पोलीस स्टेशन आवाराचे केलेले सुशोभिकरण यामुळे त्यांची विविध क्षेत्रात छाप पडली होती. चार दिवसांपूर्वी गायकवाड यांची सटाणा येथून बदली झाली. पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्साहाच्या भरात गायकवाड यांना कल्पना न देता दोन दिवसांपूर्वी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नकार देऊनही पोलीस स्टेशन, सटाणा बसस्थानक, शिवतीर्थापासून मुख्य बाजारपेठेतून यशवंतराव महाराजांच्या मंदिरापर्यंत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान शहरातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. अतिउत्साहीपणा काहीही करू शकतो याचे प्रत्यंतर पोलीस कर्मचाऱ्यांनीच शहर व तालुकावासीयांना आणून दिले. सदर मिरवणूक मार्गक्रमण करीत असताना चाहत्यांनी व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केले, त्यामुळे काही क्षणातच सटाण्यातील पोलिसांची मिरवणूक महाराष्ट्रभर पोहोचली. कोविडच्या पार्श्वभूमीवर रात्री १० वाजेपर्यंत सर्व व्यवसाय व सामाजिक कार्यक्रमांना निर्बंध असताना पोलिसांचा कार्यक्रम १० वाजून ३० मिनिटांनी संपतो. यावरून नागरिकांना नियमांची आठवून करून देणाऱ्या पोलिसांसाठी वेगळी नियमावली असते का, असा प्रश्नही नागरिकांत उपस्थित होत आहे.

230821\393223nsk_47_23082021_13.jpg

सटाण्यात पोलीस निरीक्षकाची काढण्यात आलेली मिरवणूक.

Web Title: Who exactly allowed the procession in Satana? - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.