कुणी, घर देता का, घर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:05 PM2018-08-20T13:05:35+5:302018-08-20T13:06:08+5:30
नांदगांव: कुणी, घर देता का घर ! माझ्या स्वप्नातील निवारा मला मिळेल का? या आर्ततेला साद दिली नांदगावच्या युवा फाऊन्डेशनने...कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून रंगनाथ पवार यांचा निवारा अधिक सुरक्षित झाला. पवारांच्या चेहऱ्यावर दाटलेला आनंद व युवांच्या चेहेºयावरील समाधान समाजातला माणुसकीचा झरा अखंड आहे याचे द्योतक ठरले.
नांदगांव: कुणी, घर देता का घर ! माझ्या स्वप्नातील निवारा मला मिळेल का? या आर्ततेला साद दिली नांदगावच्या युवा फाऊन्डेशनने...कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून रंगनाथ पवार यांचा निवारा अधिक सुरक्षित झाला. पवारांच्या चेहऱ्यावर दाटलेला आनंद व युवांच्या चेहेºयावरील समाधान समाजातला माणुसकीचा झरा अखंड आहे याचे द्योतक ठरले. युवा फाऊन्डेश सामाजिक संस्था (विघ्नविनायक राजा) गणेश मित्र मंडळ दरवर्षी ‘एक हात मदतीचा’ या उपक्र माच्या माध्यमातुन कपडे व फराळ वाटप करतात. ह्या वर्षी कैलास नगरच्या वस्तीत, शारीरीक दृष्ट्या विकंलाग बाबाची झोपडी आहे. ती अत्यंत दयनीय अवस्थेत होती. उन्हाळ्यातला गरम वारा असो, थंडीतले बोचरे वारे असोत की, पावसाच्या धारा सर्वांना या झोपडीत मुक्त एन्ट्री होती आणि त्यांच्या आगमनाने दिव्यांग पवारांची अवस्था बिकट होऊन जात असे. त्यांच्या या निवाºयाला युवांनी जीवनदान दिले. विष्णु निकम यांनी दिलेली ताडपत्रीने चारी बाजु बंद करण्यात आल्या. रविवारच्या सुट्टीचा खरा आंनद श्रमदानातुन युवा फाऊन्डेशनच्या सर्व सदस्यानी घेतला व सोबत मित्र परिवारील काहि मित्र देखिल या कार्यक्र मात सहभागी झाले. आता पाउस सुरु झाला तर रात्र जागून काढण्याची गरज रंगनाथ बाबाना उरलेली नाही. यावेळी युवा कार्यकर्त्यांना आठवण झाली नटसम्राट मधील स्वगताची एक तुफान भिंती वाचुन, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचुन, डोंगरा डोंगरात आहे. जिथुन कुणी ऊठवणार,अशी जागा आहे कुणी,घर देता का घर ? यावेळी प्रसाद वडनेरे, सुमित सोनवणे,ऋषी जाधव, विकास शर्मा, धनराज शिदें, गौरव रूणवाल, सद्दाम शेख व तसेच मित्र मुज्जु शेख,मयुर लोहाडे,राहिल सैय्यद, गणेश सांगळे, तौसिफ शेख,साद शेख,सचिन धामणे,राहुल ठोके आदिनी परिश्रम घेतले.