बहुरंगी लढतीत वर्चस्व कुणाचे?

By admin | Published: November 17, 2016 11:21 PM2016-11-17T23:21:31+5:302016-11-17T23:28:49+5:30

बहुरंगी लढतीत वर्चस्व कुणाचे?

Who has dominated the multi-colored match? | बहुरंगी लढतीत वर्चस्व कुणाचे?

बहुरंगी लढतीत वर्चस्व कुणाचे?

Next

 मनमाड : येथील प्रभाग क्रमांक १३ मधून माजी नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे हे निवडणूक लढवत असल्याने वर्चस्वाच्या या लढाईकडे शहराचे लक्ष लागून आहे.
प्रभाग क्रमांक १३ अ हा अनुसूचित जाती जागेसाठी राखीव आहे. या प्रभागामध्ये रमाबाई नगर, भारत नगर, रेल्वे कॉलनी, पंचवटी विभाग, रेल्वे स्टेशनच्या मागील दक्षिण भाग आदि भागाचा समावेश होतो. राजेंद्र अहिरे (रिपाइं), सतीश अल्हाट (बसपा), अनुराग निकम (राष्ट्रवादी), योगेश निकाळे (अपक्ष) या उमेदवारांमधे चौरंगी लढत आहे. रिपाइंचे जिल्हा नेते राजेंद्र अहिरे यांनी
गेली अनेक वर्षे या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. मनमाड पालिकेच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी अहिरे यांनी सांभाळली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात केलेली विकासकामे व कार्यकर्त्यांचे पाठबळ ही अहिरे यांची जमेची बाजू आहे. त्यांच्यासमोर सतीश अल्हाट, अनुराग निकम व योगेश निकाळे यांनी आव्हान उभे केले आहे. यातील अपक्ष उमेदवार
योगेश निकाळे हे रिपाइंचे जुने कार्यकर्ते असून, त्यांच्या मातोश्रींनी यापूर्वी दोन वेळा नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आहे. रिपाइंकडून डावलण्यात आल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी करून निवडणुकीत उडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक १३ ब हा सर्वसाधारण महिला जागेसाठी राखीव आहे. या प्रभागातून सुशीला अहिरे (बसपा), सीमा निकम (कॉँग्रेस), दुर्गाबाई मोरे (राष्ट्रवादी), शेख हसिना नवाब (भाजपा), अनिता भालेराव, मंदाबाई भोसले, पुंजा वाघ (अपक्ष) हे सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (वार्ताहर)

Web Title: Who has dominated the multi-colored match?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.