प्रेम कुणावर करावं? कुणावरही करावं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:55+5:302021-06-20T04:10:55+5:30

-------------------------------------- दागिन्यांना होल मारले का भाऊ? देशात १५ जूनपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार दागिन्यांवर ...

Who to love? Do it on anyone ... | प्रेम कुणावर करावं? कुणावरही करावं...

प्रेम कुणावर करावं? कुणावरही करावं...

googlenewsNext

--------------------------------------

दागिन्यांना होल मारले का भाऊ?

देशात १५ जूनपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार दागिन्यांवर कॅरेटसह संबंधित सराफाचाही लोगो असणार आहे. सोने खरेदीबाबत लोक आता खूपच जागृत झाले आहेत. त्याचाच हा उत्तम नमुना. ग्रामीण भागातील एका सुवर्णकार व्यावसायिकाकडे एक शेतकरी कुटुंब सोने खरेदीसाठी आले होते. सदर कुटुंबीयातील महिलेने दागिन्यांची खरेदी केल्यानंतर बिलिंग काऊंटरवर त्या सोन्याचे काटेकोर वजन शेतकऱ्याला पुन्हा दाखवले गेले. याचवेळी त्या शेतकऱ्याने दागिन्यावर होल मारले आहे का म्हणून विचारणा केली. शेतकऱ्याचा हा प्रश्न काऊंटरवरील रोखपालाला काही उमगला नाही. परंतु, शेतकरी पुन्हा तोच तोच आग्रह धरू लागल्यावर उलगडा झाला की, शेतकऱ्याला दागिन्यांवर हॉलमार्किंग करून पाहिजे होते. बिलिंगवाल्याने डोक्यावर हात मारून घेतला.

---धनंजय वाखारे

Web Title: Who to love? Do it on anyone ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.