नाशिकचा खासदार कोण? ; मतदारराजा आज देणार महाकौल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:15 AM2019-04-29T01:15:40+5:302019-04-29T01:16:09+5:30

। नाशिक । लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (दि.२९) मतदान घेण्यात येणार ...

 Who is the MP of Nashik? ; Mahakaul will give voters today! | नाशिकचा खासदार कोण? ; मतदारराजा आज देणार महाकौल !

नाशिकचा खासदार कोण? ; मतदारराजा आज देणार महाकौल !

googlenewsNext

नाशिक । लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (दि.२९) मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून १८ उमेदवार नशीब आजमावत असून, त्यात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, राष्टÑवादीचे माजी खासदार समीर भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार, बहुजन समाज पार्टीचे वैभव आहिरे, अपक्ष माणिकराव कोकाटे आदींचा समावेश आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून, ६ वाजता मतदान पूर्ण होईल. त्याची प्रशासकीय तयारी पूर्ण होऊन मतदान केंद्रावर साहित्य रवाना करण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतदार यादीत नाव कसे शोधाल?
https://ceo.maharashtra.gov.in 
या संकेतस्थळावर गेल्यानंतर डाव्या बाजूला दिलेल्या
लिंकवरील इलेक्ट्रोल सर्ज इंजिनवर क्लिक करा.
नावानुसार आणि आयडी कार्डनुसार इथे नाव तपासता येते.
नावानुसार तपासायचे असेल तर त्यावर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यानुसार किंवा विधानसभानुसार असे दोन पर्याय दिले आहेत.
विधानसभा मतदारसंघानुसार नाव तपासायचे असेल तर त्यावर क्लिक करावे. जिल्हा, मतदारसंघ, नाव अशी माहिती टाकल्यानंतर सर्चवर क्लिक केल्यानंतर यादीतील तुमचे नाव दिसेल.
https://www.nvsp.in 
या संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्च यूवर नेम इन इलेक्टोरल रोलवर क्लिक करा. राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल में आपका स्वागत हैं, असे वाक्य झळकेल.
मतदान केंद्राची माहिती जाणून घेऊ शकता.  या माहितीची प्रिंटही काढता येते.
मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव शोधणे,  नावात पत्त्यात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता.
बीएलओची माहितीही मिळू शकेल. निवडणूक अधिकाऱ्याची माहितीही यावर उपलब्ध आहे. कंटिन्यू या लिंकवर क्लिक केल्यानंतर दोन पद्धतीने नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. नाव, वय, जन्मतारीख, राज्य, जिल्हा, जिल्हा विधानसभा क्षेत्र ही माहिती टाकल्यानंतर मतदार यादीत नाव शोधता येते. यासह मतदार ओळखपत्र क्रमांक टाकूनही नाव शोधता येते.
मतदारांसाठी २४१८ व्हीव्हीपॅट
लोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच दोन हजार २४१८ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदांमध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.
१८६ केंद्रांतून होणार लाइव्ह कास्ट
नाशिक लोकसभा क्षेत्रातील एकूण मतदान केंद्रापैकी १८६ केंद्रांतील मतदान प्रक्रिया थेट लाइव्ह बेव कास्ट करण्यात येणार आहे. या केंद्रातील हालचालींवर निवडणूक आयोग थेट लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे, सदर लाइव्ह कॉस्ट केवळ निवडणूक विभागच बघू शकणार आहे.
सायंकाळी ६ पर्यंत रांगेत असलेल्यांना करता येणार मतदान
मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत लागता येईल. रांगेत असलेल्या शेवटच्या मतदारापर्यंत टोकन दिले जाईल. रांगेत
असलेल्या त्या मतदाराचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालेल. त्यानंतर
कुणालाही मतदान करता येणार नाही.
जीपीएस यंत्रणा असलेल्या  कंटेनरने ईव्हीएम पोहोचविणार
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका कंटेनरमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अंबडच्या सेंट्रल वेअर हाउसमधील स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील.
संवेदनशील
मतदारसंघ
नाशिक पश्चिम विधानसभा-विद्या निकेतन हायस्कूल, रायगडचौक, लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालय, पवननगर; नाशिक ग्रामोदय एज्युकेशन सोसायटी, जुने सिडको, देवळाली मतदारसंघ- विहितगाव मनपा शाळा, इगतपुरी विधानसभा मतदारसंघ- गोलदरी गाव, वाडीवºहे सेकंडरी विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीन लकडी इगतपुरी, जनता विद्यालय, इगतपुरी, सिन्नर मतदारसंघ- सोमठाणे जिल्हा परिषद शाळा, नाशिक पूर्व मतदारसंघ- नांदुरगाव मनपा शाळा, मनपा शाळा नंबर ४९ पंचक, नाशिक मध्य मतदारसंघ- मराठा हायस्कूल, महर्षी शिंदे विद्यालय, रचना विद्यालय, बी. डी. भालेकर हायस्कूल, मनपा शाळा क्रमांक ३९ नागझरी
कोण आहेत उमेदवार?
उमेदवाराचे नाव पक्ष
हेमंत गोडसे शिवसेना
समीर भुजबळ राष्टÑवादी
वैभव आहिरे बीएसपी
सोनिया जावळे आयटीपी
पवन पवार वंचित आघाडी
विनोद शिरसाठ हिजपा
संजय घोडके बीआरसी
शरद आहेर अपक्ष
प्रकाश कनोजे अपक्ष
सिंधूबाई केदार अपक्ष
माणिकराव कोकाटे अपक्ष
देवीदास सरकटे अपक्ष
धनंजय भावसार अपक्ष
प्रियंका शिरोळे अपक्ष
विलास देसले अपक्ष
शरद धनराव अपक्ष
सुधीर देशमुख अपक्ष

Web Title:  Who is the MP of Nashik? ; Mahakaul will give voters today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.