या बेवारस वाहनांचा मालक आहे तरी कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:14 AM2021-03-15T04:14:14+5:302021-03-15T04:14:14+5:30
--- नाशिक : शहरातील अनेक भागात फेरीवाले आणि टपऱ्यांचे अतिक्रमण असते. ते महापालिका हटवत नाही. मात्र काही भागात ...
---
नाशिक : शहरातील अनेक भागात फेरीवाले आणि टपऱ्यांचे अतिक्रमण असते. ते महापालिका हटवत नाही. मात्र काही भागात तर चक्क अनेक महिने अथवा वर्षानुवर्षे बेवारस स्थितीत वाहने पडून आहेत. ही वाहने कोणी नेली नाही की त्याच्यावर कोणी दावाही सांगितला नाही. तर दुसरीकडे पोलीस यंत्रणा अथवा महापालिकादेखील रस्ते अडवून असलेल्या या बेवारस वाहनांविषयी दखल घेत नसल्याने इतकेही दुर्लक्ष करण्यामागे कारण काय, असा प्रश्न केला जात आहे.
नाशिक महापालिकेची जागा म्हणजे रस्ते आपल्या व्यक्तिगत मालकीचे आहेत, असे समजून शहरातील अनेक भागात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. महापालिकेने फेरीवाला क्षेत्र तयार केल्यानंतरही बेकायदा काम करणारे फेरीवाले हटत नाहीत. त्यामागे वेगवेगळ्या आर्थिक कारणांची चर्चा होत असते. मात्र, रस्त्यात कोणीही येऊन मोटारी उभ्या कराव्यात आणि नंतर त्या हटवण्याची कोणतीही कार्यवाही जागा मालकाने करू नये ही बुचकळ्यात टाकणारी घटना आहे.
शहरातून जाणाऱ्या महामार्गाला समांतर अशा मार्गांवर अनेक भागात गॅरेज आहेत. त्यांच्या मोटारीही जागा अडवून उभ्या असतात. व्दारका ते कन्नमवार पूल या भागासह अन्य भागात तर मॅकेनिकल मार्केटच तयार झाले असून त्यातील गॅरेजच्या मोटारी रस्त्यावर उभ्या असतात. मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाण पुलानजीकची जागा म्हणजे काहींसाठी वाहनतळ झाली असून तेथे देखील शेकडो वाहने उभी असतात. मात्र, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. इतकेच नव्हे तर लोकमतने दोन ठिकाणी केलेल्या तपासणीत गंगापूर पोलीस ठाण्याजवळ तसेच शरणपूर येथेही अशाच प्रकारे रस्त्यावर बेवारस स्थितीत वाहने उभी आहेत. खरे तर महापालिकेच्या मालकीची जागा व्यापून उभ्या राहणाऱ्या या मोटारींमुळे रस्ते अडकून पडण्यापेक्षा आणखीही धोके आहेत. यापूर्वी बेवारस
वाहनांचा वापर अनेक गैरप्रकारांसाठी झाला असून तसे होण्याची भीती म्हणून का होईना परंतु यंत्रणांनी दखल घेण्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र तसे घडलेले नाही.नाशिक शहरातील अनेक भागात फेरीवाले आणि टपऱ्यांचे अतिक्रमण असते. महापालिका हटवत नाही. मात्र काही भागात तर चक्क अनेक महिने अथवा वर्षानुवर्षे बेवारस स्थितीत वाहने पडून आहेत.
ही वाहने कोणी नेली नाही की त्याच्यावर कोणी दावाही सांगितला नाही. तर दुसरीकडे पोलीस यंत्रणा अथवा महापालिकादेखील रस्ते अडवून असलेल्या या बेवारस वाहनांविषयी दखल घेत नसल्याने इतकेही दुर्लक्ष करण्यामागे कारण काय, असा प्रश्न केला जात आहे. नाशिक महापालिकेची जागा म्हणजे रस्ते आपल्या व्यक्तिगत मालकीचे आहेत, असे समजून शहरातील अनेक भागात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. महापालिकेने फेरीवाला क्षेत्र तयार केल्यानंतरही बेकायदा काम करणारे फेरीवाले हटत नाहीत. त्यामागे वेगवेगळ्या आर्थिक कारणांची चर्चा होत असते. मात्र, रस्त्यात कोणीही येऊन मोटारी उभ्या कराव्यात आणि नंतर त्या हटवण्याची कोणतीही कार्यवाही जागा मालकाने करू नये ही बुचकळ्यात टाकणारी घटना आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गाला समांतर अशा मार्गांवर अनेक भागात गॅरेज आहेत. त्यांच्या मोटारीही जागा अडवून उभ्या असतात. व्दारका ते कन्नमवार पूल या भागासह अन्य भागात तर मॅकेनिकल मार्केटच तयार झाले असून त्यातील गॅरेजच्या नादुरुस्त मोटारी रस्त्यावर उभ्या असतात.
---इन्फो--
शासकीय यंत्रणा बेफिकीर
मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाण पुलानजीकची जागा म्हणजे काहींसाठी वाहनतळ झाली असून तेथेदेखील शेकडो वाहने उभी असतात. मात्र, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. इतकेच नव्हे तर लोकमतने दोन ठिकाणी केलेल्या तपासणीत गंगापूर पोलीस ठाण्याजवळ तसेच शरणपूर येथेही अशाच प्रकारे रस्त्यावर बेवारस स्थितीत वाहने उभी आहेत. खरे तर महापालिकेच्या मालकीची जागा व्यापून उभ्या राहणाऱ्या या मोटारींमुळे रस्ते अडकून पडण्यापेक्षा आणखीही धोके आहेत. यापूर्वी बेवारस वाहनांचा वापर अनेक गैरप्रकारांसाठी झाला असून तसे होण्याची भीती म्हणून का होईना, परंतु यंत्रणांनी दखल घेण्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र तसे घडलेले नाही.
----इन्फो
महापालिका प्रशासन काय म्हणते?
महापालिकेकडे अशा प्रकारे कोठे रस्त्यावर वाहने बेवारस स्थितीत असल्याची तक्रार असेल तर कारवाई केली जाऊ शकते. मात्र, खास बेवारस मोटारींविषयी तक्रारी करण्यात आलेल्या असे आढळले नाही, असे महापालिकेच्य सूत्रांनी सांगितले. महापालिकेचा अतिक्रमण विभाग सध्या गोंधळात आहे. या ठिकाणी पूर्ण वेळ उपआयुक्त विजय पगार यांनी बदली करून घेतल्यापासून अतिरिक्त कार्यभार करुणा डहाळे यांच्याकडे आहे. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने सध्या गोंधळाचे वातावरण आहे.
----
फोटो आर वर ०६पीएचएमआर७०
--
डमी फॉरमेट- १३ अनक्लेमड वेहिकल डमी नावाने आर वर सेव्ह.
===Photopath===
140321\14nsk_1_14032021_13.jpg
===Caption===
डमी फॉरमेट