गटशिक्षणाधिकाऱ्याचा कारभार नेमका कुणाकडे?

By admin | Published: December 30, 2015 11:17 PM2015-12-30T23:17:35+5:302015-12-30T23:18:41+5:30

गटशिक्षणाधिकाऱ्याचा कारभार नेमका कुणाकडे?

Who is the responsibility of the Group Officer? | गटशिक्षणाधिकाऱ्याचा कारभार नेमका कुणाकडे?

गटशिक्षणाधिकाऱ्याचा कारभार नेमका कुणाकडे?

Next

बागलाण : शिक्षण क्षेत्रात संभ्रमनामपूर : बागलाण तालुक्याचा गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार शिक्षण विस्तार अधिकारी पी. आर. जाधव यांच्याकडे असताना बुधवारी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले बी.टी. पाटील अकस्मात कार्यालयात दाखल झाल्याने या पदाचा ‘भार’ नेमका कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्याचा शैक्षणिक विभाग सध्या चांगलाच चर्चेत आहे. गटशिक्षणाधिकारी बी.टी.पाटील यांच्या बदलीसाठी मनसेचे पंचायत समिती सदस्य सतीश विसपुते यांनी सभापती व पाच सदस्यासह उपोषण केले. त्यांची बदली किंवा त्यांना रजेवर पाठवण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी शंभरकर यांनी उपोषणकर्त्यांना दिले होते. मात्र बुधवारी शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या मांगीतुंगी भेटीदरम्यान बी.टी. पाटील पंचायत समिती कार्यालयात अचानक प्रकटल्याने शिक्षण क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी शंभरकर यांनी बागलाणचा कार्यभार शिक्षण विस्तार अधिकारी पी. आर. जाधव यांच्याकडे पुढील आदेशापर्यत दिला होता. त्यानंतरचा नवा आदेश आला नसताना रजेवर गेलेले गटशिक्षणाधिकारी पाटील अकस्मात कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे बागलाणचा ‘चार्ज’ नेमका पाटील की जाधव यांच्याकडे याबाबतचा संभ्रम कायम आहे. गटशिक्षणाधिकारी पाटील बागलाणात रूजू झाल्यापासून एकूण दोन उपोषणे झाली आहेत. बागलाणच्या इतिहासात गटशिक्षणाधिकारी यांच्या बदलीसाठी उपोषणाची पहिलीच वेळ .

Web Title: Who is the responsibility of the Group Officer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.