परीक्षार्थींना संसर्ग झाल्यास जबाबदार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:54 PM2020-07-11T22:54:11+5:302020-07-12T01:54:32+5:30
महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्रीय मनुुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र या सूचना व्यवहार्य नसून विद्यापीठ व राज्य सरकारांची तयारी नसताना परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अथवा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करीत परीक्षेच्या नियोजनावर योग्य स्पष्टीकरण देण्याची मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू)ने यूजीसीला पत्राद्वारे केली आहे.
नाशिक : महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्रीय मनुुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र या सूचना व्यवहार्य नसून विद्यापीठ व राज्य सरकारांची तयारी नसताना परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अथवा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करीत परीक्षेच्या नियोजनावर योग्य स्पष्टीकरण देण्याची मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू)ने यूजीसीला पत्राद्वारे केली आहे.
करोना प्रादुर्भावामुळे राज्यात अंतिम वर्षाच्या सत्र व अंतिम परीक्षा घेण्यास राज्य शासन व उच्च शिक्षण विभागाने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने व अन्य संबंधित केंद्रीय विभागांनी परीक्षा घेण्याचा सूचना करताना सर्व विद्यापीठांकडून त्या त्या राज्यांतील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन परीक्षा घेण्यासंबंधी प्रत्येक विद्यापीठाच्या सज्जतेचा अहवाल घेतला आहे का? असा प्रश्न मासूतर्फे यूजीसीला लिहिलेल्या पत्राद्वारे विचारण्यात आला आहे, तर, विद्यार्थ्यांची सुरक्षा, परीक्षा स्थळांवरील कर्मचारी, परीक्षक आणि विद्यापीठांमधील प्रशासकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा, याबद्दल काय नियोजन करण्यात आले आहे, असेही विचारण्यात आले आहे. मासूने हे पत्र यूजीसीचे अध्यक्ष प्रा. डी. पी. सिंग, उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, सचिव प्रा. रजनीश जैन व उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे यांना पत्र पाठविले असल्याची माहिती मासूचे नाशिक विभागप्रमुख सिद्धार्थ काळे यांनी दिली आहे.
परीक्षेदरम्यान एकाही विद्यार्थी वा परीक्षेशी निगडीत कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली तर काय करणार यांसह परीक्षेच्या कालावधीत कन्टेन्मेंट झोनमध्ये पुरेशी वाहतूक सुनिश्चित करण्यात आली आहे का? यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर विचारणा करण्यात आली असून, त्याबद्दल सखोल स्पष्टीकरण द्यावे, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.