सारे कुटुंबच सरसावले मदतीला .....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 12:54 IST2020-03-29T12:53:44+5:302020-03-29T12:54:54+5:30
पेठ - जगाला कोरोना या रोगाने त्रस्त केले आहे त्यामुळे प्रत्येक सामाजिक संस्था ,खाजगी संस्था, कार्यकर्ते इत्यादींनी मदतीचे हात दाखवले आहेत. पेठ येथील वार्डे कुंटूबी यांनी ही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून कोरोना च्या पाश्र्वभूमीवर मदतीचा हात दिला आहे.

सारे कुटुंबच सरसावले मदतीला .....
पेठ - जगाला कोरोना या रोगाने त्रस्त केले आहे त्यामुळे प्रत्येक सामाजिक संस्था ,खाजगी संस्था, कार्यकर्ते इत्यादींनी मदतीचे हात दाखवले आहेत. पेठ येथील वार्डे कुंटूबी यांनी ही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून कोरोना च्या पाश्र्वभूमीवर मदतीचा हात दिला आहे.
पेठ येथील शिवसेना महिला आघाडी उपतालुका प्रमुख आरूणा रमेश वार्डे व वा परीवाराचे मदतीसाठी हात सरसावले आहेत. दररोज किमान 200 माक्स स्वत: तयार करून ते अधिकारी, कर्मचारी व सामान्य जनतेला वाटप करतात. शिवाय रोजगारानिमित्त स्थलांतरीत झालेल्या व लॉक डाऊन मुळे अडकून पडलेल्या आदीवासी मजूरांना जेवनाची व्यवस्था केली. या सामाजिक कार्यात अरूणा वार्डे यांना त्यांचे पती रमेश वार्डे, मुले सागर वार्डे व चेतन वार्डे सुद्धा सहभागी होऊन परीश्रम घेत आहेत . अशा प्रकारे अनेक सामान्य नागरिक या संकटाचा सामना करण्याासाठी पुढे सरसावले आहेत.