मराठा आरक्षणावरून मलाच टार्गेट का करता? मंत्री छगन भुजबळ यांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 05:42 AM2023-10-03T05:42:48+5:302023-10-03T05:43:01+5:30
मराठा समाजालाच्या कुणबी प्रमाणपत्रावरून सध्या वाद सुरू आहे.
नाशिक : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, ही भूमिका माझी एकट्याचीच नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व पक्षाच्या नेत्यांची तीच भावना आहे, मग मलाच टार्गेट का करता असा प्रश्न राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमाशी बोलताना केला.
मराठा समाजालाच्या कुणबी प्रमाणपत्रावरून सध्या वाद सुरू असून, त्यातच ओबीसींमधून आरक्षण नको या भूमिकेबाबत मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोलीत भुजबळ यांनी भूमिका बदलायला हवी, असे मत व्यक्त केले होते.
आता माघार नाही : जरांगे पाटील
मराठा समाज आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार वेळ दिला आहे. तेव्हा सरकारने विलंब न लावता मराठा समाजाला तातडीने सरसकट आरक्षण द्यावे, असे आवाहन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले. कुरुंदा येथे सोमवारी मराठा आरक्षण ‘एल्गार सभा’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.